Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून(6 डिसेंबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खराब झाली आहे.

भारताने पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 27 षटकात 4 बाद 56 धावा केल्या होत्या. भारताचे केएल राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात बाद झाले आहेत.

विशेष म्हणजे हे चारही फलंदाज ड्राइव्हचा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाले आहेत. यात कर्णधार कोहलीला आॅस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजाने एका हाताने अप्रतिम झेल घेत बाद केले आहे.

कोहलीने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर 11 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट गमावली आहे. त्याने कमिन्सने टाकलेल्या फुल लेन्थ गोलंदाजीवर ड्राइव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो चेंडू गलीमध्ये उभ्या असणाऱ्या ख्वाजाच्या डाव्या बाजूला गेला.

ख्वाजानेही त्याच्या डावीकडे झेप घेत काही क्षणातच एका हाताने झेल घेतला आणि कोहलीला 3 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

सध्या भारताकडून पहिल्या सत्रात नाबाद असलेले चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा दुसऱ्या सत्रात फलंदाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताची अडखळत सुरुवात, पहिल्या सत्रातच गमावल्या चार विकेट्स

पहिला कसोटी सामना टीम इंडिया जिंकणारच, जाणुन घ्या कारण

बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाची ऐतिहासिक ट्विटरबाजी

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास

You might also like