बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दिवसाची ऐतिहासिक ट्विटरबाजी

अॅडलेड | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेला आज सुरुवात होत आहे. आजपर्यंत टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया देशात खेळलेल्या सर्वच मालिकेत पराभव पाहिला आहे.

या वर्षी मात्र कोहलीची टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार मानली जात आहे. भारतीय संघ गेल्या काही मालिकांमध्ये जशी परदेशात चांगली कामगिरी करत आहे तशीच या खेळांची सोशल मीडियावरही चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कधी तर हा खेळ मैदानावर कमी आणि डिजीटल माध्यमांवरच जास्त खेळला जातोय की काय असे वाटते.

डीजिटल माध्यमांंमधील आघाडीचा प्लॅटफाॅर्म म्हणुन ट्विटर या मायक्रो ब्लोगिंग वेबसाईटकडे पाहिले जाते. २००६ वर्षात जन्म झालेल्या या माध्यमाच्या खेळपट्टीवर पाय रोवायला बीसीसीआय आणि आयसीसीला मात्र २०१०चे आॅगस्ट उजाडले.

अशा या माध्यमावर सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळाबद्दल केवळ ताज्या घडामोडी ट्विट केल्या जात. मात्र आता काळ बदलला असून सर्व संघ या माध्यमाचा प्राथमिक माध्यम म्हणुन वापर करत आहे. तसेच यात व्हिडीओ, फोटोंचाही आता चांगला वापर केला जातोय. अनेक वेळा संघाची घोषणाही याच माध्यमावरुन होते.

या माध्यमाचा जन्म झाल्यापासून भारताने आॅस्ट्रेलियाचे एकूण ३ दौरे केले असून त्यातील दोन दौऱ्यात सोशल मीडियाचा चांगला वापर झाला होता तर पहिल्या दौऱ्यावेळी बीसीसीआय किंवा आयसीसीचे ट्विटरवर अस्तित्वच नव्हते.

टीम इंडिया जेव्हा २०१०-११ मध्ये आॅस्टेलिया दौऱ्यावर गेली होती तेव्हाचे पहिल्या दिवसाचे काही खास ट्विट- 

टीम इंडिया जेव्हा २०१४-१५ मध्ये आॅस्टेलिया दौऱ्यावर गेली होती तेव्हाचे पहिल्या दिवसाचे काही खास ट्विट- 

आज सामना सुरु होण्यापुर्वी आयसीसी आणि बीसीसीआयने केलेले काही ट्विट्स- 

महत्त्वाच्या बातम्या:

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेचा इतिहास

अंदाज दिग्गजांचे: कोण जिंकणार भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका?

आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने

You might also like