वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईचे चाहते जगभरात आहेत. विशेष म्हणजे, या चाहत्यांमध्ये क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. यात विराट कोहली अव्वलस्थानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, यापूर्वीही विराटकडून या गोष्टीचा उल्लेख झाला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह याला मैदानावर पुनरागमन करताना पाहून विराट म्हणाला होता की, “अखेर द रॉक परत आला आहे.” हे स्टंपच्या मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड झाले होते. खरं तर, हे वाक्य डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार द रॉक रिंगमध्ये आल्यावर बोलतो. आता पुन्हा एकदा विराट असेच काहीसे करताना दिसला.
गुरुवारी (दि. १९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघात आयपीएल २०२२मधील ६७वा सामना खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाने बाजी मारली आणि ८ विकेट्सने सामना खिशात घातला. गुजरातच्या डावाला सुरुवात होतेवेळी विराट कोहली (Virat Kohli) याने सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याला इशारा करत अंडरटेकरच्या ‘थ्रोट- स्लॅश’ (Undertaker Iconic Throat Slash Style) स्टाईलचे अनुकरण केले. यानंतर गिल ४ चेंडू खेळून १ धावेवर बाद झाला. विराटने गिलविरुद्ध केलेली ही ऍक्शन कॅमेऱ्यात कैद झाली.
https://twitter.com/Biscuit8Chai/status/1527563466491711490?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527563466491711490%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fipl-2022-virat-kohli-using-the-undertaker-sign-at-shubman-gill-100136
या हंगामात विराटने अशी काही ऍक्शन करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. या हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा बेंगलोरने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १८ धावांनी विजय मिळवल्यानंतर अंडरटेकरची स्टाईल कॉपी केली होती. विराट कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याला म्हणाला होता की, “आपण अंडरटेकरप्रमाणे पुन्हा आलो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२मधील अव्वल ४ संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने गुजरातविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यासाठी विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विराटने या सामन्यात ५४ चेंडूत ७३ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकारही लगावले. विशेष म्हणजे, आयपीएल २०२२मधील अव्वल चार संघामध्ये बेंगलोरचा समावेश झाला. पहिल्या क्रमांकावर गुजरात संघ कायम आहे. दुसऱ्या स्थानी लखनऊ संघ आहे, तर तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स संघ आहे.