---Advertisement---

उद्या पुन्हा भिडणार दोन अंडर १९ विश्वचषक विजेते कर्णधार

---Advertisement---

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत सामन्यात उद्या दोन १९ वर्षाखालील विश्वचषक विजेते कर्णधार समोरासमोर येणार आहेत. भारत या वनडे मालिकेत १-० असा आघाडीवर असून दुखापतग्रस्त फाफ डुप्लेसीच्या जागी २३ वर्षीय एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार आहे.

एडिन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०१४मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंतच्या इतिहासात हाच एकमेव विश्वचषक जिंकला आहे. तर कर्णधार विराट कोहलीने भारताला २००८ मध्ये १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता.

२०१४ला जेव्हा आफ्रिकेने हा विश्वचषक जिंकला होता तेव्हा अंतिम सामन्यात खेळलेला कागिसो रबाडा हाही सध्याच्या आफ्रिका टीमचा भाग आहे तर २००८मधील विश्वविजेत्या भारतीय संघातील केवळ विराट कोहली हाच सध्या वनडे संघात आहे.

एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील १९९१ पासूनचा १३वा कर्णधार ठरणार आहे. डुप्लेसीने आजपर्यंत १३ वनडेत संघाचं नेतृत्व केलं असून त्यात संघाला ११ विजय मिळवून दिले आहे.

कर्णधार कोहलीने जेव्हा २००८ला विश्वचषक जिंकला होता तेव्हा एडिन मार्करम केवळ १३ वर्ष आणि ४ महिन्यांचा होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment