माजी दिग्गज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने खुलासा केला की, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनण्याची संधी त्याच्याकडे होती. अनिल कुंबळे यांनी 2017 साली भारताचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले, तेव्हा सेहवाने या पदासाठी अर्ज देखील केला होता. पण काही कारणास्तव त्याला ही जबाबदारी स्वीकारली नाही.
अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि तेव्हाचा भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात वाद असल्याच्या अनेक बातम्या त्यावेळी आल्या होत्या. याच कारणास्तव कुंबळेंनी पुढे प्रशिक्षकपद देखील सोडले. कुंबळेंनंतर विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले जाऊ शकत होते. पण अखेरीस ही जबाबदारी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना मिळाली. शास्त्रींनी 2017 ते 2021 दरम्यान मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले. 2021 साली भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात सुमार खेळी केल्यानंतर शास्त्रींनी प्रशिक्षकपद सोडले आणि ही जबाबदारी सध्या राहुल द्रविड सांभाळत आहेत.
एका माध्यमाशी चर्चा करताना सेहवागला भारतीय संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक बनण्याविषयी प्रश्न विचार काल गेला. यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाला की, संघाचा कर्णदार आणि प्रशिक्षक बनता आले नाही, याची त्याला कसलीच खंत वाटत नाही. त्याने आपल्या कारकिर्दीत जे मिळवले, त्यावर तो खुश आहे. तो एक नजफगढ नावाच्या लहान शहरातून आणि शेतकरी कुटुंबातून आला आहे. शेतकरी कुटुंबातून येऊन भारतीय संघाता जागा मिळवणे, ही त्याच्यासाठी मोठी बाब आहे. तो असेही म्हणाला की, त्याला चाहत्यांकडून जे प्रेम मिळाले, तेवढेच प्रेम त्याला कर्णधार असतानाही मिळाले असते.
प्रशिक्षकपदासाठा का केला होता अर्ज –
सेहवाने यावेळी असाही खुलासा केला की, त्यावेळचे बीसीीसआय सचिव अमिताब चौधरी आणि विराट कोहली यांनी सांगितल्यामुळे त्याने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. विराट आणि चौधरी यांच्यासोबथ बैठक झाल्यानंतर चौथरींनी त्याला सांगितले की, विराट आणि कुंबळेंमध्ये मतभेत आहेत. त्यामुळे त्याला मुख्य प्रशिक्षक बनण्यात सांगितले गेले. सेहवागने मात्र या प्रस्तावाला होकार किंवा नकार कळवला नव्हता. कुंबळेंनी 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रशिक्षकपद सोडणार होते. त्यानंतर भारताला वेस्ट इंडीज दौरा करायचा होता. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी जर सेहवागला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले, तर सपोर्टा स्टाप मर्जितील हवा, अशी अट सेहवागने मांडली होती, जी मान्य झाली नाही.
(Virat Kohli wanted, but Virendra Sehwag himself refused to become the head coach of India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या प्रदर्शनात कमी नाही! माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला हवा
“टप्प्याचा विचार करू नकोस फक्त वेगात चेंडू टाक”, उमरानला संघसहकाऱ्याचा सल्ला