नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकासाठी (t20 world cup 2021) निवडला गेलेला भारतीय संघ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनुभवी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने देखील संघात पुनरागमन केले होते. तत्पूर्वी, टी२० विश्वचषकात खेळण्याच्या चार वर्ष आधीपासून तो भारताच्या टी२० संघाबाहेर होता. आता अशी माहिती समोर आली आहे की, अश्विनला पुनरागमनाची संधी मिळण्यामागे माजी टी२० कर्णधार विराट कोहली (virat kohli) याचा मोठा हात होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ही माहिती दिली.
अश्विनला टी२० विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले नव्हते. मात्र, पहिले दोन्ही सामने पराभूत झाल्यानंतर शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्याने शेवटच्या तीन सामन्यात सहा विकेट्स घेतल्या आणि यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट देखील सहापेक्षा कमी होता. गांगुलींनी सांगितल्याप्रमाणे माजी कर्णधार विराट कोहली अश्विनला विश्वचषक संघात सामील करू इच्छित होता.
पत्रकार बोरिया मजूमदार यांचा ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ या कार्यक्रमात गांगुली बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मला स्वतःला विश्वास नव्हता की, तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. मात्र, विराट त्याला संघात ठेऊ इच्छित होता आणि त्याला जी काही थोडी संधी मिळाली त्याने त्या संधीचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला.”
गांगुलींनी यावेळी बोलताना या गोष्टीचे संकेत देखील दिले की अश्विन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आगामी काळातील मालिकांमध्ये देखील सहभागी असेल. “मला असे कोणतेच कारण नाही दिसत नाही की, ज्यामुळे आम्ही अश्विनचे समर्थन करू नये. तो किती विजेत्या संघाचा भाग आहे. २०११ विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता. २०१३ मध्ये जेव्हा त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तेव्हा तो या स्पर्धेत प्रमुख गोलंदाज होता,” असे गांगुली म्हणाले.
गांगुली म्हणाले, अश्विनचे जर तुम्ही कसोटी क्रिकेटमधील आकडे पाहिले, तर ते अप्रतिम आहेत. मला हे सांगण्याची गरज नाहीय, की अश्विन एक अप्रतिम खेळाडू आहे. ही गोष्ट त्याच्या आकड्यांवरून सिद्ध होते. त्याची कारकीर्द संपली असे म्हणू शकत नाही. तसेच अश्विन सध्या जे प्रदर्शन करत आहे, ते पाहून आश्चर्य वाटत नसल्याचे देखील गांगुलींनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
ऍडीलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हन जाहीर; मात्र, प्रमुख गोलंदाज संघाबाहेर
‘सर’ जडेजा घेणार कसोटीतून निवृत्ती? कारण आहे अचंबित करणारे
विश्वचषकात पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान! तारीख झाली फिक्स