आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूमध्ये (PBKS vs RCB) चंदिगढच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. ह्या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इतिहासातील त्या संघांमध्ये सामील आहेत, ज्यांनी आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रयत्न असेल की, ते या हंगामाची आयपीएल ट्रॉफी जिंकतील. तसेच मुल्लांपूरमध्ये होणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार (RCB former cricketer) आणि आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नजरा आयपीएल स्पर्धेतील एक विक्रम त्याच्या नावावर करण्यावर असतील.
विराट कोहली (virat kohli) आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे आणि या यादीत टॉप वर पोहोचण्यासाठी त्याला फक्त 3 चौकारांची गरज आहे. जर विराटने पंजाब विरुद्ध त्याच्या पारी दरम्यान 3 चौकार झळकावले तर तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचेल. सध्या हा रेकॉर्ड शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नावावर आहे. शिखरने 222 सामन्यांच्या 221 डावात 768 चौकार झळकावले आहेत. तसेच कोहलीने 265 सामन्यांच्या 257 डावांमधे 766 चौकार झळकावले आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आहे ज्याने 184 सामन्यात 663 चौकार झळकावले आहेत.
विराट कोहलीच्या नावावर आयपीएल मध्ये 291षटकार आहेत जर त्याने पंजाब विरुद्ध 9 षटकार झळकावले तर तो आयपीएल इतिहासात 300 षटकार झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल आणि सर्वात जास्त षटकार झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. इतिहासात केवळ एक फलंदाज क्रिस गेल (khris gel) आहे, ज्याने 300 षटकार झळकावले आहेत. कोणत्याही अन्य खेळाडूने हा आकडा पार केलेला नाही.
जर विराट कोहलीने पंजाब विरुद्ध 89 धावांची पारी खेळली, तर तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. विराटच्या नावावर सध्या 13488 धावा आहेत आणि सध्या तो पाचव्या स्थानावर आहे. तसेच कायरन पोलार्डच्या नावावर 695 सामन्यांच्या 617 डावात 13537 धावा आहेत. तसेच शोएब मलिकच्या नावावर 13571 धावा आहेत.






