---Advertisement---

सचिन, व्हीव्हीएस आणि द्रविडच्या यादीत जागा बनवणार विराट कोहली! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये करणार रेकॉर्ड

On: बुधवार, जून 7, 2023 6:33 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर बुधवारी (7 जून) सुरू झाला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यासाठी हा सामना खास ठरणार आहे. विराट सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड या दिग्गजांच्या यादीत नव्याने जोडला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियन (India Vs Australia) संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उतरले आहेत. प्रथम गोलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना चांगली सुरुवात दिली. ऑस्ट्रेलिन संघाने अवघ्या 2 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतकर 71 धावांवर दुसरी, तर 76 धावांवर तिसरी विकेट ऑस्ट्रेलियाने गमावली. पहिल्या तीन पैकी एकही फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक करू शकला नाही.

ऑस्ट्रेलियन संघाचा डाव संपल्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात येतील. आपला संघ फलंदाजीला आल्यानंतर विराट कोहली () एक खास विक्रम आपल्या नावावर करू शकतो. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध 2000 कसोटी धावा करणारा विराट भारताचा केवळ पाचवा फलंदाज बनू शकतो. यासाठी त्याला डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात अजून फक्त 21 धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आतापर्यंत खेळलेल्या 25 सामन्यांमध्ये 1979 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. सचिनने 39 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3630 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, ज्याने 29 सामन्यांमध्ये 2434 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 32 सामन्यांमध्ये 2143 धावा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना कुटल्या आहेत. चौथा क्रमांक चेतेश्वर पुजारा याचा आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 सामन्यांमध्ये 2033 धावा केल्या आहेत. पुजारा बुधवारी (6 जून) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळत आहे आणि यादीत आपले स्थान उचावण्यासाठी त्याच्याकडे देखील संधी आहे. विराट या यादीत लवकरच नव्याने सामिल होणार आहे, हे मात्र नक्की. (Virat Kohli will complete his 2000 Test runs against Australia in the WTC final)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय
सचिन तेंडुलकर – 3630 (39 सामने)
व्हीव्हीएस लक्ष्मण – 2434 (29 सामने)
राहुल द्रविड – 2143 (32 सामने)
चेतेश्वर पुजारा – 2033 (25 सामने)
विराट कोहली – 1979 (25 सामने)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सर्वात महत्त्वाच्या सामन्यातून अश्विनची हाकालपट्टी, अनुभवी गोलंदाजाविषयी काय म्हणाला रोहित? लगेच वाचा
अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---