विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात (Virat Kohli Removed As ODI Captain) आल्यापासून हा दिग्गज खेळाडू मीडियात चर्चेत आहे. विराटबाबत दररोज अशा बातम्या येत आहेत, ज्या ऐकून चाहते थक्क झाले आहेत. मात्र, या अफवा किंवा बातम्या पसरल्यानंतर आता विराट कोहली स्वतः पुढे येऊन अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. विराट बुधवारी (१५ डिसेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी ही पत्रकार परिषद होईल. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. त्याआधी विराट कोहलीला अनेक मोठ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. (India Tour Of South Africa)
प्रत्येकाला विराटकडून जाणून घ्यायचे आहे की त्याला वनडे कर्णधारपदी राहायचे होते की नाही? टी२० कर्णधारपद सोडताना विराटने वनडे आणि कसोटी कर्णधारपदी आपण कायम राहणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, अचानक निवडकर्त्यांनी त्याला वनडे कर्णधारपदावरूनही हटविले. अशा परिस्थितीत विराटची प्रतिक्रिया जाणून घ्यायला सर्वांना आवडेल.
विराटसाठी दुसरा मोठा प्रश्न असेल की त्याला वनडे कर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी निवडकर्त्यांनी त्याच्याशी चर्चा केली की नाही? दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडल्यानंतर निवडकर्त्यांनी विराटच्या अनुपस्थितीत आणखी एक बैठक घेतली. ज्यामध्ये त्याला वनडे कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला.
विराटसाठी या पत्रकार परिषदेत तिसरा मोठा प्रश्न असेल की, त्याचे रोहित शर्माशी काही मतभेद आहेत का? विराट वनडे कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरच रोहित शर्माला अचानक दुखापत झाली आणि तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. चाहत्यांच्या मनात शंका आहे, त्यामुळे विराट कोहलीला या मुद्द्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच या दौऱ्यावरील वनडे मालिकेतून माघार घेतल्याविषयीही विराटला प्रश्न विचारले जातील. (Rohit Sharma New ODI Captain)
महत्त्वाच्या बातम्या-
कोणामुळे रोहित झाला गंभीर दुखापतग्रस्त? ५ वर्षांपूर्वी देखील झाली होती घटना
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’