हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ३५४ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना वाचवायचा असेल तर, दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. परंतु, राजस्थान रॉयल्सच्या युवा खेळाडूने दिग्गज खेळाडूंच्या शतक झळकावण्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. गेल्या २ वर्षांपासून शतक झळकावू शकलेला नाही. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचा युवा खेळाडू रियान पराग याने ट्विट करत विराट कोहली दुसऱ्या डावात शतक झळकावेल अशी भविष्यवाणी केली आहे.
त्याने ट्विट करत लिहिले की,”विराट कोहलीचे दुसऱ्या डावात शतक”. विराट तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या ७ धावा करत माघारी परतला होता. जेम्स अँडरसनने त्याला सातव्यांदा बाद केले होते. तसेच या संपूर्ण मालिकेत त्याने १७.२५ च्या सरासरीने अवघ्या ६९ धावा केल्या आहेत.
Virat Kohli 100 2nd innings lesgoo🤞🏻 #INDvsEND
— Riyan Paragg (@ParagRiyan) August 27, 2021
या कसोटी सामन्यातील पहिले दोन्ही दिवस इंग्लंडच्या नावावर राहिले. इंग्लिश कर्णधार जो रूटने आपल्या कारकिर्दीतील २३ वे आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावले. तो १२१ धावा करत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. तसेच तीन वर्षांनी कसोटीत पुनरागमन करणाऱ्या डेविड मलानने ७० धावांची खेळी केली. दुसरा दिवसही इंग्लंडच्या फलंदाजांच्या नावावर राहिला. परंतु, शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी गडी बाद करायला सुरुवात केली. अखेर तिसऱ्या दिवशी ४३२ धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. (Virat Kohli will score hundred in second innings of headingley Leeds 3rd test match against England)
भारतीय संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात
या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला होता. संघातील मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात अवघ्या ७८ धावा करता आल्या. या डावात रोहित शर्माने सर्वाधिक १९ तर अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले. तर इंग्लंड संघाकडून जेम्स अँडरसन आणि ओवरटन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हिटमॅन’चा विक्रमी षटकार! कपिल देव यांना मागे टाकत रोहितने दिग्गजाच्या यादीत मिळवले चौथे स्थान
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो
ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली