मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६७ वा सामना गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच प्लेऑफच्या आशाही जिवंत ठेवल्या. बेंगलोरच्या या विजयात विराट कोहली याने मोठा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
विराट दीड वर्षांनी सामनावीर
या सामन्यात (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) गुजरातने बेंगलोरसमोर १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या विराटने (Virat Kohli) ५४ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. त्यामुळे बेंगलोरने १९ व्या षटकातच १७० धावा करत सामना जिंकला. विराटला त्याच्या या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
विराटचा हा आयपीएल २०२० नंतर पटकावलेला पहिला सामनावीर पुरस्कार ठरला. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये अखेरचा सामनावीर पुरस्कार १० ऑक्टोबर २०२० रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद ९० धावा केल्यानंतर मिळवला होता. त्यानंतर त्याला २०२१ आयपीएल हंगामात एकही सामनावीर पुरस्कार जिंकता आला नव्हता. पण त्याची सामनावीर पुरस्कार (Man of the Match in IPL) मिळण्याची प्रतिक्षा अखेर संपली.
For his match winning knock of 73, @imVkohli is adjudged Player of the Match as #RCB win by 8 wickets.
Scorecard – https://t.co/TzcNzbrVwI #RCBvGT #TATAIPL pic.twitter.com/5xMYY1DbDD
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2022
सुरेश रैनाची केली बरोबरी
आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची विराटची ही १४ वी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सुरेश रैनाची बरोबरी केली आहे. रैनाने देखील १४ सामनावीर पुरस्कार जिंकले आहेत (Most Man of the match in IPL).
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने १८ वेळा आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार आपल्या नावे केला आहे. तसेच एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने १७ वेळा सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये एकूणच सर्वाधिक सामनावीर पुरस्कार एबी डिविलियर्सने आपल्या नावावर केले आहेत. त्याने २५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बटरल भाऊ सुसाट! गुजरात-बंगळुरू सामन्यानंतर ऑरेंज कॅपची शर्यत अधिक तीव्र, बघा यादी
मुंबई इंडियन्सनंतर इंग्लंड संघाला मोठा झटका, महत्वाचा गोलंदाज दीर्घ कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर
बंगळुरूचं प्लेऑफचं तिकीट आता मुंबईच्या हातात! बघा संपूर्ण समीकरण