---Advertisement---

दुसऱ्या दिवशी शतक करणाऱ्या विराट कोहलीचे ३ शानदार पराक्रम

On: शुक्रवार, ऑक्टोबर 5, 2018 11:14 AM
---Advertisement---

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद शतक केले आहे. १८४ चेंडूंचा सामना करताना विराटने हे शतक केले. त्याच्या शतकी खेळीत ७ चौकांराचा समावेश होता.

कसोटीत केला पराक्रम-

कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील २४वे शतक ठरले. याबरोबर त्याने कसोटीत भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली. त्याने वीरेंद्र सेहवागला या यादीत मागे टाकले.

विराटचे कर्णधार म्हणुन हे कसोटीतील १७वे शतक ठरले. तसेच २०१८मधील त्याचे हे चौथे शतक आहे.

सचिनचा विक्रम मोडला- 

कसोटीत जलद २४ शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीने सचिनला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने सचिनने १२५ डावातील केलेल्या २४ शतकांचा विक्रम मोडत आता १२४ डावांत २४ शतके केली आहेत.

कर्णधार म्हणुनही पराक्रम- 

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणुन सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. विराटने कसोटीत कर्णधार म्हणुन १७ शतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-रिषभ पंत आणि षटकारांच नातं काही खास

दुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम

विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment