शुक्रवारी (१३ मार्च) राजकोट येथे रणजी ट्रॉफीच्या ८६व्या मोसमातील अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकून इतिहास रचला.
सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनादकटच्या (Jaydev Unadkat) जबरदस्त कामगिरीच्या जोरावर संघाला रणजी ट्रॉफीचा जिंकण्यात मदत झाली. त्याने स्वत: संघाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. रणजीच्या संपूर्ण मोसमात त्याने एकूण ६७ विकेट्स घेतल्या आहेत.
उनादकटच्या रणजीतील दमदार प्रदर्शनाला पाहता प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याला भारतीय संघात सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे शर्मा यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला लहानपणी प्रशिक्षण दिले होते.
यावेळी शर्मा म्हणाले की, “मी सौराष्ट्र संघाला त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा देतो. विशेषत: उनादकटचे अभिनंदन. त्याने सामन्यात महत्त्वपूर्ण स्पेल टाकले आणि पूर्ण हंगामात ६७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मला वाटते की उनादकटला भारतीय संघात सामाविष्ट करायला हवे. त्याने यापुर्वीही स्वत:ला आयपीएलमध्ये सिद्ध करून दाखवले आहे. तसेच, रणजीतील दमदार प्रदर्शनाने दाखवून दिले आहे की तो खेळाच्या या स्वरूपात कितपत उपयोगी ठरू शकतो.”
पुढे बीसीसीआय संदर्भात बोलताना शर्मा म्हणाले, “बीसीसीआयच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्यांनी चाहत्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत योग्य तो निर्णय घेतला आहे. परिस्थितींनुसार आयपीएलला स्थगित करणे हेच उचित आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
– भारताला पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बघावी लागणार ३ महिने वाट…
– जाणून घ्या १४३ वर्षांचा कसोटी क्रिकेटचा इतिहास
– बचपन के यार, सौराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार