गेल्या कित्येक महिन्यांपासून जगभरातील क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची वाट पाहत होते. परंतु या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारपासून (१९ जून) या सामन्याला जोरदार सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यातील शनिवारचा खेळ कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने थांबवण्यात आला.
या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने अप्रतिम कव्हर ड्राईव्ह शॉट खेळत चाहत्यांचे मन जिंकले. या कव्हर ड्राईव्हचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शुबमन गिल माघारी परतल्यानंतर कोहलीने मैदानात प्रवेश केला होता. त्याने आपल्या डावातील चौथ्याच चेंडूवर उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह शॉट खेळला. हा शॉट त्याने निल वॅगनरने टाकलेल्या चेंडूवर खेळला. जे पाहून चाहते देखील उत्साहित झाले होते. अनेकांनी कोहलीची कव्हर ड्राईव्ह नावडती आहे म्हणणाऱ्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमवर निशाणा साधला आहे.
या मोठ्या सामन्यात कोहलीची धमाकेदार सुरुवात पाहून अनेक दिग्गज खेळाडूंनीही आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. तसेच अशी आशा व्यक्त केली जात आहे की, तो या सामन्यात मोठी खेळी करेल.
कोहलीने कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर नाबाद ४४ धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये ७५०० धावा पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला आहे. त्याने हा कारनामा १५४ व्या डावात केला. तसेच दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी देखील १५४ डावात ७५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. (Virat kohli’s classical cover drive video went viral on social media)
https://twitter.com/imsonuuuuu/status/1406240857280245771?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406240857280245771%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fvideo-virat-kohli-s-exotic-cover-drive-off-neil-wagner-during-wtc-final-at-southampton-can-be-watched-on-loop-hindi-2467735
भारताच्या पहिल्या डावाच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी ६२ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर रोहित आणि शुबमन गिल बाद होऊन माघारी परतले होते. लंचनंतर विराट कोहली आणि पुजाराने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुजाराही ८ धावा करत माघारी परतला. कर्णधार कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे हे दोघेही मैदानावर टिकून आहेत. शनिवारचा खेळ थांबला तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत.
या सामन्यात कर्णधार कोहली सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने ६१ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. याबाबतीत त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने ६० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रॅप सॉन्गला ढोलचा तडाखा! भारतीय चाहत्यांनी विशेष पद्धतीने ‘किंग कोहली’ला केले चीयर
भारताच्या युवा रणरागिनीने रचला इतिहास, गोलंदाजी अन् फलंदाजीत कमाल करत नोंदवला ‘विश्वविक्रम’