विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी भारतीय संघातील दिग्गज फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. परिणामी भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले. न्युझीलंड संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.
यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली याच्यावर सपाटून टीका केली जात आहे. आता कर्णधार विराट कोहलीने आपल्या टीकाकारांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर, सर्वच स्तरातून विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे. परंतु हेही विसरून चालणार नाही की, याच संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना कसोटी मालिकेत धूळ चारली आहे.
आपल्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत विराटने भारत हा संघ नसून एक कुटुंब असल्याचे म्हटले आहे. त्याने भारतीय संघाचा एक फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “हा एक संघ नसून, एक कुटुंब आहे. आम्ही एकत्र पुढे जाऊ,”असे लिहिले आहे. (Virat kohli’s emotional tweet went viral on social media)
This isn’t just a team. It’s a family. We move ahead. TOGETHER 💙🇮🇳 pic.twitter.com/E5ATtCGWLo
— Virat Kohli (@imVkohli) June 24, 2021
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. यामध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर कर्णधार कोहलीने ४४ धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघांकडून डेवोन कॉनवेने अर्धशतकी खेळी करत न्यूझीलंड संघाला २४९ धावांपर्यंत पोहोचवले होते.
परंतु दुसऱ्या डावात भारतीय संघातील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि इतर फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात अवघ्या १७० धावा करता आल्या. न्यूझीलंड संघाकडून काइल जेनिसनने दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले. न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी अवघ्या १३९ धावांची आवश्यकता होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केन विलियमसन आणि रॉस टेलर यांनी ९६ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला पहिलावहिला कसोटी कसोटी विश्वचषक जिंकून दिला.
महत्वाच्या बातम्या-
चाहते का म्हणतायेत ‘काळ्या जिभेचा आकाश चोप्रा’ ? जाणून घ्या पूर्ण प्रकरण
भारताला पराभूत केल्यानंतरही न्यूझीलंडने जिंकली मनं, ‘या’ शब्दात मानले आभार
‘तुम्ही यासाठी पात्र होता’, न्यूझीलंडच्या विजयानंतर रवी शास्त्री यांनी दाखवली खिलाडूवृत्ती