विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज हेन्रीच क्लासेन याच्या वादळी शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपुढे 187 धावांचे आव्हान ठेवले होते. गुरुवारी (दि. 18 मे) आयपीएल 2023च्या 65व्या सामन्यात क्लासेनने त्याचे पहिले-वहिले आयपीएल शतक झळकावले. यावेळी त्याने शतक पूर्ण करताच आरसीबी संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली तसेच वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांनीही त्याचे कौतुक केले. यादरम्यानचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
हेन्रीच क्लासेन (Heinrich Klaasen) याने आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 51 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 6 षटकार आणि 8 चौकारांचाही पाऊस पाडला होता. शतक झळकावताच क्लासेनने धमाकेदार अंदाजात जल्लोष केला. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) हेदेखील क्लासेनच्या शतकावर त्याची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. क्लासेनच्या शतकानंतर विराट आणि हर्षल टाळ्या वाजवताना दिसले. यादरम्यानचा व्हिडिओ आयपीएलने ट्विटरवर शेअर केला आहे.
Did You Watch ?
A maximum to bring up the 💯
Heinrich Klaasen scored a brilliant 104 off 51 deliveries.
Live – https://t.co/stBkLWLmJS #TATAIPL #SRHvRCB #IPL2023 pic.twitter.com/B6t2C4jfy1
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2023
क्लासेन शेवटच्या चेंडूपर्यंत टिकला असता, तर हैदराबादची धावसंख्या कदाचित 200च्या पार जाऊ शकली असती. मात्र, हर्षल पटेल टाकत असलेल्या 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला. यावेळी बाद झाल्यानंतरही क्लासेनने विक्रमांचे मनोरे रचले. त्याने या हंगामात 4 किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिसरी सर्वाधिक धावसंख्या रचली.
A magnificent 100 from Heinrich Klaasen on a slow pitch,has been arguably the best player of spin this year & what a form he's having.His century was applauded by the entire Hyderabad crowd ,even Virat Kohli could not remain without appreciation.
Kavya Maran#SRHvRCB . #RCBvsSRH pic.twitter.com/W5Paahd4yS— Usman Shaikh 🇮🇳 (@shaikhusman_7) May 18, 2023
आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या (4 किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर)
128 धावा- रिषभ पंत, विरुद्ध- सनरायझर्स हैदराबाद*
117 धावा- साइमंड्स विरुद्ध- राजस्थान रॉयल्स*
115 धावा- वृद्धिमान साहा, विरुद्ध- कोलकाता नाईट रायडर्स*
104 धावा- हेन्रीच क्लासेन, विरुद्ध- आरसीबी
103 धावा- बेन स्टोक्स, विरुद्ध- गुजरात लायन्स*
क्लासेन याने कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) (18) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी रचली. तसेच, त्याने हॅरी ब्रूक (नाबाद 27) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. हैदराबादच्या डावात क्लासेनच्या दबदब्याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, त्याने एकट्याने 51 चेंडूत 104 धावा केल्या, तर संघाच्या इतर फलंदाजांना 69 चेंडूत 82 धावाच करता आल्या. (virat kohlis heartwarming reaction on heinrich klaasens century went viral see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फाफ आणि कोहलीने आमच्या…’, म्हणत बालेकिल्ल्यात दारुण पराभव होताच हळहळला सनरायझर्सचा कॅप्टन मार्करम
सचिन ते सेहवाग, विराटच्या शतकानंतर ‘या’ 4 दिग्गजांच्या खास प्रतिक्रिया; एबीडी म्हणाला, ‘ते भूकेले…’