बेंगळुरू । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघावर विश्वास व्यक्त करताना हा संघ दक्षिण आफ्रिकेत चमकदार कामगिरी करेल असे म्हटले आहे.
भारतीय संघ आजपर्यंत कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकला नाही. भारतीय संघ २००६-०७मध्ये पहिल्यांदा या देशात कसोटी सामना जिंकला आहे. तर ५ कसोटी मालिका संघ येथे पराभूत झाला आहे. २०१०-११ची मालिका येथे ड्रॉ अवस्थेत सुटली होती.
“मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत जाऊन नक्कीच इतिहास रचेल. मला याची पूर्ण खात्री आहे.कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात मोठी क्षमता आहे आणि ते चांगला खेळ करत आहे. ” असे कुंबळे म्हणाला.
२०१७ यावर्षासाठीचा बेंगलोरच्या क्रीडा पत्रकार असोशिएशन (Sports Writers Association of Bangalore (SWAB)) कडून दिला जाणारा ‘कोच ऑफ द इयर’ पुरस्काराचा कुंबळे मानकरी ठरला आहे.
या पुरस्कार सोहळ्यानंतर तो बोलत होता.