---Advertisement---

आज विराटसेना टी २० मालिकेत घेणार का विजयी आघाडी

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2018 6:04 PM
---Advertisement---

सेंच्युरीन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघ १-०ने आघाडीवर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची भारतीय संघाला चांगली संधी आहे.

वनडे मालिकेप्रमाणेच टी २० मालिकेतही वर्चस्व राखण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. त्यामुळे ते मालिकेत पुनरागमन करण्याचाच इराद्याने ते मैदानात उतरतील.

आजचा सामना सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडिअमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९.३० वाजता सुरु होईल. या स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारला होता. त्याचबरोबर वनडे मालिकेत पार पडलेल्या दुसऱ्या आणि सहाव्या वनडेत भारताने अनुक्रमे ९ आणि ८ विकेट्सने विजय मिळवला होता.

तसेच आज भारताच्या मधल्याफळीच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताची मधली फळी धावा जोडण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे आज मनीष पांडे आणि सुरेश रैना यांच्या कामगिरीकडे लक्ष राहील.

मागील सामन्यात रैनाने स्फोटक खेळ केला होता. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. त्याचबरोबर एमएस धोनीलाही धावा करण्यात मागील काही सामन्यांमध्ये अपयश आलेले आहे.

याबरोबरच या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले असल्याने कुलदीप यादवला ११ जणांच्या संघात स्थान मिळण्याची संधी आहे. त्याने ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत १७ विकेट्स घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिका संघाला सध्या दुखापतींनी घेरलं आहे. त्यांचा नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉक वनडे मालिकेच्या वेळीच दुखापत ग्रस्त झाले होते. त्यानंतर पहिल्या टी २० सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स गुडघा दुखापतीने मालिकेबाहेर पडला आहे.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. प्रभारी कर्णधार जेपी ड्युमिनीला आता यांना पर्याय असणारे खेळाडूंना घेऊनच खेळावे लागणार आहे.

आजही सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सामन्याला उशीर होऊ शकतो.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार),शिखर धवन, केएल राहुल, सुरेश रैना, एम एस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर.

दक्षिण आफ्रिका संघ: जेपी ड्युमिनी(कर्णधार), फरहान बेहार्डीन, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरीस,अँडिल फेहलूकवयो, ताब्राईझ शम्सी, जुनिअर डाला,रिझा हेन्ड्रिक्स,ख्रिस्तियन जोंकर,डेन पीटरसन,एरॉन फँगिसो,जे जे स्मटस.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment