आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगली होती. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ गडी राखून जिंकला होता. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी केली होती. या डावात त्याने गगनचुंबी षटकार लगावला होता. हा षटकार पाहून विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या रोमांचक सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्स संघाने दिलेल्या १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तुफान फटकेबाजी सुरू ठेवली होती.
मॅक्सवेलने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी केली होती. यात त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले होते. दरम्यान ग्लेन मॅक्सवेलने तब्बल १०० मीटरचा षटकार लगावला होता. हा षटकार पाहून, नॉन स्ट्राईकला असलेल्या कर्णधार विराट कोहलीला आश्चर्य वाटले होते. त्याने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/OneCricketApp/status/1380565616881332225?s=20
https://twitter.com/pakas2009/status/1380568167785787397?s=20
ग्लेन मॅक्सवेलने या सामन्यात दोन षटकार मारले होते. त्याने आयपीएलमध्ये शेवटचा षटकार २७ एप्रिल २०१८ मध्ये दिल्ली संघाकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ठोकला होता. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये एकही षटकार मारता आला नव्हता. त्याने आयपीएल २०१९ मध्ये १२ सामन्यात १६९ धावा केल्या होत्या, तर २०२० मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळताना त्याने १३ सामन्यात १०८ धावा केल्या होत्या.
परंतु यंदा तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ताबडतोड फलंदाजी करत जोरदार पुनरागमन केले आहे. तो यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कमालचं! भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्रिटीश शहरात आयपीएल बनला निवडणुकीचा मुद्दा
पहिल्या सामन्यात रंगले ‘बॅटल ऑफ जायंट्स’, पाहा कोण आहेत ‘हे’ दोन विदेशी खेळाडू






