---Advertisement---

विराट कोहलीचा विक्रमविराज, रोहितला मागे टाकत रचणार नवा इतिहास!

On: गुरूवार, एप्रिल 10, 2025 7:18 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये आज 10 एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विराट कोहलीने आधीच आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आता 8,168 धावा आहेत. पण आता किंग कोहली षटकारांचा बादशहा बनण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. तो आज रोहित शर्माच रेकॉर्ड मोडू शकतो.

आयपीएल इतिहासात आत्तापर्यंत सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आयपीएल मधून निवृत्ती घेऊन 4 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण अजूनही त्याच्या 357 षटकारांच रेकॉर्ड कोणीही मोडू शकलं नाही.

विराट कोहलीच्या नावावर आतापर्यंत त्याच्या 256 सामन्यात आयपीएल करिअरमध्ये 278 षटकार तसेच दुसरीकडे रोहित शर्माच्या नावावर 282 षटकार आहेत. याचबरोबर रोहित आता आयपीएलमध्ये सर्वात जास्त शतक झळकावणारा भारतीय खेळाडू आहे. जर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली अजून 5 षटकार ठोकू शकला तर तो इतिहास रचू शकतो. तसेच विराटने आताच एका मैदानावर सर्वात जास्त षटकार ठोकून क्रिस गेलला मागे टाकले आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त षटकार होण्याच्या यादीत क्रिस गेल सर्वात पुढे आहे. दुसऱ्या स्थानी रोहित तर तिसऱ्या स्थानी विराट कोहली आहे.एमएस धोनी आणि एबी डिविलियर्स चौथ्या, पाचव्या स्थानावर आहेत. विराट आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमात्र खेळाडू आहे. कोणताही खेळाडू 7000 किंवा अधिक धावा करू शकला नाही.

क्रिस गेल – 357 षटकार
रोहित शर्मा – 282 षटकार
विराट कोहली – 278 षटकार
एमएस धोनी – 259 षटकार
एबी डिविलियर्स – 251 षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---