विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आयपीएल २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. गुरुवारी (२२ एप्रिल) झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानला १० गडी राखून पराभूत केले. या सामन्यात विराट कोहलीनेही चमकदार फलंदाजी केली. या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्येही ६००० धावा पूर्ण केल्या आणि आयपीएलमध्ये हा आकडा गाठणारा पहिला फलंदाज बनला आहे.
विराटने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ६०२१ धावा केल्या आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आयपीएलमध्ये पहिल्या क्रमांकापासून सातव्या क्रमांकापर्यत फलंदाजी केली आहे. यादरम्यान तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर दुसर्या क्रमांकावरही तो यशस्वी झाला आहे.
कोणत्या क्रमांकावर किती धावा
विराट हा आयपीएलचे इतिहासातील एकमेव असा खेळाडू आहे जो सर्वच्या सर्व १४ हंगाम एकाच संघासाठी म्हणजे आरसीबीसाठी खेळला आहे. विराटने आत्तापर्यंत १९६ सामन्यांमध्ये आरसीबीचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या १९६ सामन्यांच्या १८८ डावांमध्ये ३८.३५ च्या सरासरीने ६०२१ धावा बनविल्या आहेत. त्यामध्ये ५ शतके व ४० अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत पहिला क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. दरम्यान त्याने सर्वाधिक २६९६ धावा तिसऱ्या क्रमांकावर काढल्या असून, दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १६८७ धावा ठोकल्या आहेत. विराट पहिल्या क्रमांकावर ही बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. त्या स्थानी त्याच्या बॅटमधून ८०१ धावा निघाल्या आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर त्याने अनुक्रमे ३७६ व १७३ धावा बनवल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २३७ धावांचे योगदान त्याने दिले. विराटने सर्वाधिक कमी ५१ धावा सातव्या क्रमांकावर खेळताना बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाबविरूद्ध फलंदाजीला उतरताच रोहितच्या नावे झाले ‘हे’ खास द्विशतक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वार्षिक करार, बड्या खेळाडूंना मिळाला डच्चू