---Advertisement---

कर्णधार कोहलीनेही केले दिनेश कार्तिकचे कौतुक

---Advertisement---

रविवारी आर. प्रेमदासा येथे झालेल्या निदहास ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारताने बांग्लादेशवर  चार विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक. त्याने सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत तिरंगी टी २० मालिकेवर भारताचे नाव कोरले.

या सामन्यात दिनेश कार्तिकने अखेरच्या २ षटकात तुफानी फलंदाजी केली. त्याने नाबाद 8 चेंडूत 29 धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीबद्दल आणि भारताच्या विजयाबद्दल आजीमाजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघावर ट्विटरमार्फत शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला.

यात सचिन तेंडूलकर, व्हि व्हि एस लक्ष्मन, युवराज सिंग, आर अश्विन, हरभजन सिंग आणि जसप्रित बुमराह यांच्यासारख्या बऱ्याच जणांनी अभिनंदन केले.

तसेच सध्या विश्रांती घेत असलेला भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने कोलंबोमधील या अप्रतिम विजयाबद्दल प्रभारी कर्णधार रोहित शर्मा, दिनेश कार्तिक व भारतीय संघाचे कोैतूक करणारे ट्विट केले.

विराटने ट्विट मध्ये लिहिले आहे की, “काल रात्रीचा क्रिकेटचा सामना काय रोमांचकारी झाला, पूर्णपणे सांघिक कामगिरी झाली. बीग अप बॉइज. दिनेश कार्तिक खूप चांगला खेळला. ” कोहलीच्या या ट्विटला ट्विटरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या या ट्विटला जवळ जवळ 75000 लाईक्स आणि 8400 रीट्विट आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment