---Advertisement---

विराट अन् रोहितचा फोन आला तर कोणाचा कॉल उचलशील? २३७ विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणतो…

On: सोमवार, मे 24, 2021 3:11 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. विराटप्रमाणेच मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा यानेही कोट्यावधी चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यातही इंडियन प्रीमियर लीगमुळे त्यांच्या प्रसिद्धीत झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ चाहतेच नव्हे तर आजी-माजी क्रिकेटपटूही त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना काही क्षण बोलण्यासाठी आतुर असतात.

अशात जर एकाच वेळी या दोन्ही क्रिकेटपटूंनी तुम्हाला फोन केला तर कोणाचा कॉल उचलाल?, असा प्रश्न विचारल्यास कोणतीही व्यक्ती थोडा वेळ गोंधळून जाईल. मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाज याने पटकन या प्रश्नाचे उत्तर दिले.

गोलंदाजी प्रदर्शनात सातत्य नसल्यामुळे नेहमी संघातून आत-बाहेर होणारा क्रिकेटपटू रियाज याने नुकतीच एक मुलाखत दिली होती. क्रिकेट पाकिस्तानने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रियाज दिलखुलासपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे.

दरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा एकाच वेळी फोन आल्यास कोणाचा कॉल उचलशील?, असा प्रश्न रियाजला विचारला गेला. या प्रश्नाचे रियाजने अगदी झटक्यात उत्तर दिले. उत्तर देताना त्याने रोहित नव्हे तर विराटचे नाव घेतले.

Virat Kohli or Rohit Sharma? | Jos Buttler in PSL | 10 Questions with Wahab Riaz

रियाजने २०११ सालच्या विश्वचषकात मोहाली येथे सामन्यात भारताविरुद्ध केलेले गोलंदाजी प्रदर्शन कोणीही विसरू शकत नाही. या दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यात विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, एमएस धोनी, जहीर खान यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रियाजच्या नावे एकूण २३७ विकेट्सची नोंद आहे. यात वनडेतील १२०, कसोटीतील ८३ आणि टी२०तील ३४ विकेट्सचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कौतुक करावं तेवढं कमीच! कोरोनाविरुद्ध झुंज देण्यात बीसीसीआयची मोठी मदत; दुसऱ्यांदा देणार ‘हे’ मोलाचे योगदान

उच्चशिक्षित भारतीय शिलेदार, ज्याची डिग्री अशी की इस्त्रो किंवा नासामध्ये लागली असती नोकरी; पण…

पहिल्या ३ सामन्यात ३० विकेट्स, ईडन गार्डनवर हॅट्रिक; मग सर्वांपुढे भारतीय संघाला केले लाजिरवाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---