ऑस्ट्रेलिया क्रिकेट पुरूष संघ सध्या भारताच्या (INDvsAUS)दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तर ही मालिका खेळण्यासाठी भारतात पोहोचलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने मोठा खुलासा केला आहे. नुकतेच आशिया चषक (Asia Cup) 2022 पार पडला. या स्पर्धेचे अपडेट त्याने ठेवले नाही असे कमिन्सने म्हटले आहे. तर यातील त्याला फक्त दोनच गोष्टी माहित आहे, हे पण त्याने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) टी20 मालिका खेळण्यासाठी भारतात आला आहे. हा कसोटीचा कर्णधार आणि भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी उपकर्णधार. यावेळी त्याने आशिया चषकाबाबत मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले, “मी आशिया चषक फॉलो केला नाही. मात्र मला एवढेच माहित आहे की या स्पर्धेत विराट कोहलीने शतक केले आहे.”
कमिन्स शनिवारी (17 सप्टेंबर) क्रिकेट.कॉम.एयू याच्याशी बोलताना म्हणाला, “आम्ही सध्या मोहालीमध्ये आहोत. आम्ही आमचा पहिला अभ्यास सत्र पूर्ण केला आहे. संघामध्ये अनेक नवीन चेहरे आहेत. अभ्यासादरम्यान टीम डेविड याने काही उत्तम शॉट्स खेळले. त्याचे ते शॉट्स पाहून त्याला मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहे.” गतविजेता टी20 चॅम्पियन भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे, तर यातील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) खेळला जाणार आहे.
आशिया चषकाचा 15वा हंगाम अर्थातच 2022ची स्पर्धा खूपच रोमांचक ठरली. यातील काही सामने शेवटच्या षटकापर्यंत पोहोचले. तर ही स्पर्धा अनेक कारणांनी चर्चेत राहिली. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) याने तब्बल 1019 दिवसांनतर आंतरराष्ट्रीय शतक केले, तर पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या खेळाडूंमध्ये विवाद पाहायला मिळाला. तसेच श्रीलंका संघाने चषक उंचावत सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
कमिन्सने टाईम्सशी बोलताना म्हणाला, “प्रामाणिक सांगतो मी आशिया चषक पाहिलेलाच नाही. माझ्या मते श्रीलंका ही स्पर्धा जिंकली? तर मी एकही सामना पाहिलेला नाही. मात्र विराट कोहलीने शतक केले हे माहित आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. कधी ना कधी तो फॉर्ममध्ये परतणारच होता. यामुळे तो ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.”
आशिया चषकामध्ये विराटचा फॉर्म परतला. त्याने या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. तर या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा (276) करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचे सत्र थांबेना! आता ‘हा’ वेगवान गोलंदाज महत्वाच्या मालिकेपूर्वी संघातून बाहेर
कॅप्टन रोहितने सांगूनच टाकले, कोण करणार विश्वचषकात ओपनिंग?
काय सांगता, पीसीबीसाठी फुकटची हमाली करतात अध्यक्ष रमीज राजा! म्हटले, ‘घरच्यांची इच्छा नव्हतीच…’