भारतीय संघ सध्या बांगलादेेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसीय मालिकेेची सुरुवात रविवार (दि. 4 डिसेंबर)पासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडीयम येथे दुपारी 12 वाजेपासून खेळवला जाईल. या एकदिवसीय मालिकेत सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा रन मशीन विराट कोहली याच्यावर असणार आहेत. एकदिवसीय क्रिकेट विराटचा आवडता प्रकार आहे आणि तो जुलैनंतर पहिल्यांदाच 50 षटकांचा सामना खेळणार आहे. विराटला बांगलादेशमध्ये बांगलादेशविरुद्ध धावा करायला जास्त आवडत आणि याचमुळे तो या संघाविरुद्ध त्यांच्याच भुमीवर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. बांगलादेशमध्ये त्यांच्याच विरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंग धोनी यांसारखे फलंदाज खूप मागे आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) याने बांगलादेशमध्ये खेळलेल्या 8 एकदिवसीय सामन्यात 90.66च्या सरासरीने 544 धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि दोन अर्धशतके देखील सामील आहेत. कोहली व्यतिरिक्त कोणताही भारतीय फलंदाज बांगलादेशमध्ये बांगालादेश विरुद्ध 500पेक्षा जास्त धावा करु शकलेला नाही. या यादीच्या टॉप 5मध्ये कोहलीनंतर वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni), गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा समावेश आहे. तसेच सचिन या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
तसेच भारतीय संघातील सामील असलेल्या बाकीच्या भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर या ठिकाणी शिखर धवन (Shikhar Dhawan) याने 4 सामन्यात 186 धावा केल्या आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 6 सामन्यात 143 धावा केल्या आहेत. सध्याच्या भारतीय संघात विराट असा एकमेव फलंदाज आहे ज्याने बांगलादेशमध्ये शतक झळकावले आहे.
भारतीय संघाची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरला ढाका येथे खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यापासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर 7 डिसेंबरला खेळवला जाईल, तसेच या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबरला खेळवला जाईल. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघाला कसोटी मालिका देखील खेळायची आहे. 14 डिसेंबर पासून चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाईल, तसेच या दौऱ्याचा शेवट 22 डिसेंबरला खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने होईल.(Virat scored most runs in Bangladesh against Bangladesh for India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीची रिप्लेसमेंट घोषीत, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाला संधी
मोठी बातमी! बांगलादेश दौऱ्याच्या वनडे मालिकेतून भारताच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कसोटीला मुकणार का?