अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला. 40 षटकाचां खेळ झाल्यानंतर दोन्हीपैकी एक संघ जिंकणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. सामना सुवर ओव्हरमध्येही निकाली निघाला नाही. भारताला जिंकण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या. रोहित शर्मा सामनावीर ठरला, पण विराट कोहली संघासाठी एकही धाव करू शकला नाही. असे असले तरी, विराट कोहली सामना टाय झाल्यानंतर मैदानात जे करत होता, त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील हा तिसरा आणि टी-20 मालिकेतील शेवटचा सामना होता. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आणि टी-20 मालिका 3-0 अशा अंतराने खिशात घातली. बुधवारी (17 जानेवारी) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांना पैसा वसून खेळ पाहायला मिळाला यात शंका नाही. पण त्याचसोबत विराट कोहली (Virat Kohli) याचा मजेशीर अंदाज देखील पाहायला मिळाला. 20 षटकात अफगाणिस्तानने 212 धावा केरून सामन्यात बरोबरी साधली, तेव्हा विराट ‘मोये मोये’ या गाण्यानवर डान्स करताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Virat Kohli on Moye Moye 🤣 pic.twitter.com/1Hq02dGY5s
— Shubham Kumar (@TheShubhamKr_) January 17, 2024
दरम्यान उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर शेवटच्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला 12 धावा हव्या होत्या. पण रवी बिश्नईने टाकलेल्या या षटकात तिसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानने आपल्या दोन्ही विकेट्स गमावल्या. परिणामी भारतीय संघ विजयी झाला. त्याआधी पहिल्या सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी 17 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण भारतीय संघा देकील 16 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
तत्पूर्वी भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या चार विकेट्स संघाची धावसंख्या अवघी 22 असताना भारताने गमावल्या. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी 190* धावांची सर्वोत्तम भागीदारी पार पाडली आणि संघाची धावसंख्या 212 धावांपर्यंत पोहोचवली. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघानेही 212 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याने 69 चेंडूत 121 धावांची सर्वोत्तम टी-20 आंतरराष्ट्रीय खेळी केली. हे त्याच्या टी-20 कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. (Virat Virat’s ‘Moye Moye’, live match dance viral after IND vs AFG match tied)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहित भैयासोबतचा प्रत्येक क्षण…’, अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रिंकू सिंगचं कर्णधाराबद्दल लक्षवेधी विधान
IND vs AFG: ‘सामना एक विक्रम अनेक’ बेंगलोर टी20 मध्ये बनले ‘हे’ मोठे विक्रम, जे मोडणे केवळ अशक्यच