विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराटने अलीकडच्या काळात जे काही केले ते फार कमी खेळाडूंना करता आले आहे. अलीकडेच 2023 च्या विश्वचषकात त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावून सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराट कोहली आमच्या काळात असता तर त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असते, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “आज सचिन तेंडुलकरच्या खूप धावा आहेत. रिकी पाँटिंग, ब्रायन लारा, वसीम अक्रम आणि शेन वॉर्न यांच्यासह महान खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. विराट कोहली आमच्या जमान्यात असता तर त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असता.” (virat would have been competitive in our era shoaib akhtar says compare with sachin)
अख्तर पुढे म्हणाला, “त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असते. पण आताच्या तुलनेत त्यावेळी त्याने तेवढ्याच धावा केल्या असत्या. त्याने आत्तापर्यंत जेवढ्या केल्या आहेत. पण त्या काळात वसीम अक्रमचा सामना करणे सोपे नव्हते. विराट म्हणजे विराट. तो या शतकातील महान फलंदाज आहे. या काळाची आणि त्या काळाची तुलना आपण करू शकत नाही. त्याने 100 शतके झळकावीत अशी माझी इच्छा आहे.”
आयसीसी टी20 विश्वचषक 2022 पासून विराट कोहली टी20 फॉरमॅटमध्ये खेळला नव्हता. विराट काही कारणास्तव अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने 16 चेंडूत 29 धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यातही विराटच्या बॅटमधून एकही मोठी खेळी दिसली नाही. विराट आता टी-20 क्रिकेटमध्ये थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. कारण 2024 च्या विश्वचषकापूर्वी भारत कोणतीही एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार नाही. (Shoaib Akhtar’s big statement about Virat Said If he had been in our time)
हेही वाचा
Ram Mandir । प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एक दिवस आधीच विराट अयोध्येत दाखल, सचिन आणि जडेजाबाबत मोठी अपडेट
इंग्लंडला तगडा झटका! कसोटी मालिकेपूर्वी धडाडीचा फलंदाज मायदेशी परतला, वाचा काय आहे कौटुंबीक कारण