भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मागच्या एका महिन्यापासून कुठे आहे, हे चाहत्यांना माहीत नाही. इंग्लंडविरुद्ध सध्या भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. विराट सुरुवातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून बाहेर पडला. नंतर त्याने शेवटच्या तीन सामन्यांमधूनही माघार घेतली. चाहत्यांना विराट खेळत नसल्याचे नक्की कारण समजत नव्हते. पण मंगळवारी (20 फेब्रुवारी) अखेर विराटच्या या निर्णायामागचे कारण समजले.
विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून तो दुसऱ्यांदा वडील झाल्याेच माहिती चाहत्यांना दिली. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्काने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. वामिका या पहिल्या मुलीनंतर विराट-अनुष्काला दुसरा मुलगा झाला आहे. त्याचे नाव या दोघांनी ‘अकाय’ असे ठेवले आहे. विराटने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांना दिली. पण तो सध्या कुठे आहे, याबाबत कुणालाही काहीच माहिती नाही.
विराटबाबत चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. पण स्टार फलंदाज स्वतःची प्रायवेसी जवत असल्याचे दिसते. असे असले तरी, सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट कोहली काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये आहे. स्टार फलंदाज सध्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
Virat Kohli’s latest picture at London.#Virat pic.twitter.com/aFrP4P4oR4
— Satish Mishra???????? (@SATISHMISH78) February 20, 2024
विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “मला ही माहिती देताना आनंद होत आहे की, आम्ही 15 फेब्रुवारी रोजी आमच्या बेबी बॉय अकाय याला जन्म दिला. वामिकाच्या छोट्या भावाचे या जगात स्वागत आहे. आमच्या जीवनातील या सुंदर क्षणी तुमचा आशिर्वाद आणि शुभेच्छा पाहिजेत. आम्ही विनंती करतो की, आमच्या प्रायवेसी सन्मान करा.”
दरम्यान, विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघ सध्या मायदेशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला, तर मालिका देखील भारताच्या नावावर होईल. (Virat’s first glimpse after becoming a father for the second time! A special photo from abroad came to the fore)
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटचा ‘हा’ महाविक्रम स्मृतीला करायचाय आपल्या नावावर! आरसीबी कॅप्टनचा खुलासा
IND vs ENG । बुमराहला रांची कसोटी सामना खेळायचा होता? वेगवान गोलंदाजाबाबत महत्वाची माहिती






