---Advertisement---

सेहवाग आणि धोनीने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाने वाचली विराटची कारकीर्द? वाचा काय घडले होते

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 1:10 AM
Virat Kohli and MS Dhoni.jpg
---Advertisement---

सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चर्चाचा विषय ठरत आहे. विराटने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आता रोहित शर्मा टी२० संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटने जेव्हापासून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे, तेव्हापासून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून बराच काळ संघाबाहेर बसलेला नाही. मात्र, विराटच्या खूप कमी चाहत्यांनी ही गोष्ट माहीत असेल की, त्याची कारकिर्दीची सुरुवात काही खास ठरली नव्हती.

सुरुवातीच्या काळात एक वेळ अशी आली होती की, त्याला संघातून बाहेर केले जाणार होते, पण त्यावेळी एमएस धोनी आणि विरेंद्र सेहवागमुळे त्याला संघात कामय ठेवले गेले होते.

विरेंद्र सेहवागने कर्णधार विराटसोबत त्या वेळी काय घडले होते, याचा खुलासा केला आहे. विराटने २०११ मध्ये त्याची पहिली कसोटी मालिका खेळली होती. या मलिकेत विराटने वेस्ट इंडीजविरुद्ध खूपच खराब प्रदर्शन केले होते. त्याने या मालिकेत तीन कसोटी सामन्यात अवघ्या ७६ धावा केल्या होत्या. त्यावेळी कोहलीला संघातून बाहेर केले जाणार होते, पण विरेंद्र सेहवाग आणि एमएस धोनीमुळे त्याला संघाता कायम ठेवले गेले होते.

सेहवागने या गोष्टीचा खुलासा २०१६ मध्ये केला होता. त्यावेळी सेहवाग भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत समालोचन करत होते. सेहवागने त्यावेळी सांगितले होते की, निवडकर्ता विराटला संघातून बाहेर करू इच्छित होते, पण त्याने आणि धोनीने असे होऊ दिले नाही.

त्यावेळी सेहवाग म्हणाले होते की, “निवडकर्ता २०१२ मध्ये पर्थवर विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्माला खेळवू इच्छित होते. मी उपकर्णधार होता आणि धोनी संघाचे नेतृत्व करत होता आणि आम्ही निर्णय घेतला की, आम्हाला कोहलीचे समर्थन करावे लागेल. बाकी इतिहास आहे.”

दरम्यान, सेहवाग आणि धोनी या दोघांनी त्यावेळी विराटला संघात कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय खूप महत्वापूर्ण ठरला. त्यानंतर अशी एकदाही वेळ आली नाही, जेव्हा विराटला संघातून बाहेर करण्याविषयी निवडकर्त्यांना विचार करावा लागला असेल. विराटने त्यावेळी पर्थ कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात ७५ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

वेंकटेश अय्यरला विराटने काय दिला होता खास सल्ला? अष्टपैलूने केलाय खुलासा

जरा इकडे पाहा! पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ खेळाडूंवर हाकालपट्टीची टांगती तलवार

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सपशेल फ्लॉप, मेंटर धोनीची स्वारी परतली मायदेशी, फोटो व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---