पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला हार पत्करावी लागली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली असलेला पाकिस्तानी संघ 60 धावांच्या मोठ्या अंतराने न्यूझीलंड विरुद्ध हरलेला आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरती बाबर आझम त्याच्या संथ खेळीमुळे वारंवार ट्रोल होत असतो. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने 90 चेंडू वरती केवळ 64 धावा केल्या. यानंतर चाहते बाबर आझमला भरपूर ट्रोल करत आहेत. याबाबतीत अनेक विनोद तयार करून सोशल मीडियावरती पोस्ट केले जात आहेत. यावरती भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि पार्थिव पटेल यांनी देखील बाबर आझम वरती हास्यास्पद कॉमेंट केली आहे.
क्रिकबझच्या एंकरने वीरेंद्र सेहवाग आणि पार्थिव पटेल यांना विचारले गेले की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यात “बॉबी करू शकेल” अशी स्थिती होती? यानंतर वीरेंद्र सेहवाग म्हणाले की, मला “बॉबी” बद्दल माहिती नाहीये, बॉबी आहे तरी कोण…त्याचबरोबर, भारतीय संघाचे माजी सलामीवीर यांचे असे म्हणणे आहे की, बाबर आझमला शेवटपर्यंत क्रिझ वरती राहायला हवे होते. पण तो अस करण्यात यशस्वी होऊ शकला नाही. वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाले, “बॉबी” नक्की आहे तरी कोण, आधी ते सांगा.
वीरेंद्र सेहवागचे बोलणे ऐकून माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल हसू रोखू शकले नाहीत. वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणले, “बॉबी”,किंग अजून किती नावे आहेत त्याची?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी हरविले आहे. सुरुवातीलाच फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने 50 षटकात 5 विकेट वरती 320 धावांचा स्कोअर बनविला. पाकिस्तान संघाने 47.2 षटकात 260 धावा केल्या. त्यात बाबर आझमने 90 चेंडू वरती 64 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो! भारतालाही पराभूत करणार का बांगलादेश ? काय म्हणाला कर्णधार
‘भारताच्या ताकदीपुढे नमते!’ सामन्यापूर्वीच पाकिस्तानी दिग्गजाची शरणागती!
IND vs BAN; बांग्लादेशनं जिंकला टाॅस फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11






