इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ऍजबस्टन येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात वाद झाला. या वादानंतर इंग्लंडचा फॉर्मात असलेला फलंदाज जॉनी बेयरस्टो पेटून उटला आणि त्याने शतकी खेळी केली. यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने या वादावरून विराटचे कान टोचले होते. यानंतर आता तो विराटबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे ट्रोल होत आहे.
ऍजबस्टन कसोटी (IND vs ENG) सामन्यादरम्यान समालोचन करताना सेहवागच्या (Virender Sehwag) तोंडून असे काही शब्द निघाले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टिकेचा भडिमार होत आहे. खरे तर, सामन्यादरम्यान विराट (Virat Kohli) स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना नाचू लागला होता. हे पाहून सेहवागची जीभ घसरली आणि त्याने विराटला ‘छमिया’ म्हटले. याच टिप्पणीवर सेहवाग क्रिकेटप्रेमींच्या निशाण्यावर आला आहे. तो विराटला छमिया म्हणतानाचे (Virender Sehwag’s Chamiya Remark) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Wtfff did Sehwag just said chamiya to kohli . Man u are legend but you can't use this kind of words for our legend
— DIVESH THAKUR (@div00989) July 3, 2022
What is this commentary???? https://t.co/nB8TzlYN1y
— rea (@reaadubey) July 3, 2022
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, इंग्लंडच्या खेळाडूची विकेट गेल्यानंतर विराट त्याचे दोन्ही हात वर करून नाचत आहे. त्याला नाचताना पाहून समालोचन करत असलेला मोहम्मद कैफ म्हणतो की, ‘विराट कोहलीला पाहा‘. यावर सेहवाग म्हणतो की, ‘छमिया नाचत आहे.’
Did I just heard it right ?? @virendersehwag saying to Virat Kohli – "छमिया नांच रही हैं" ….
A commentator saying this to the modern day legend of Indian team ,This is not acceptable @BCCI …This is very poor kind of thing sehwag has done.#INDvENG #ENGvsIND #ENGvIND #INDvsENG pic.twitter.com/fLIF7pRaVg— sandeep (@Vicharofsandeep) July 3, 2022
Someone sack Sehwag from commentary. Guy said "chamiyan naach rhi hai" after watching Kohli dance after Broad's wicket
— Vk. (@W4nsh_) July 3, 2022
सेहवागच्या या शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी यावरून संपूर्ण हिंदी समालोचकांच्या पॅनेलवर टिकाही केली आहे. हिंदी समालोचनात दिवसेंदिवस वायफळ चर्चा होताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तसेच काहींनी सेहवागला समालोचनातून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे.
https://twitter.com/Priyesh_py29/status/1543587360038080513?s=20&t=gOCriKDEHKWohnBkbpLOBQ
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याच्यात जो वाद झाला, त्यावरही सेहवाग व्यक्त झाला आहे. सेहवागच्या मते विराटने बेयरस्टोसोबत वाद घातल्यामुळे तो अधिक आक्रमकपणे खेळू लागला आणि पुढे शतक देखील पूर्ण केले.
Jonny Bairstow's Strike Rate before Kohli's Sledging -: 21
Post Sledging – 150Pujara ki tarah khel rahe thhey, Kohli ne Pant banwa diya bewajah sledge karke #IndvsEng
— Virender Sehwag (@virendersehwag) July 3, 2022
सेहवाने ट्वीटरच्या माध्यमातून असे सांगितेल की, विराटने बेयरस्टोसोबत स्लेजिंग करून बरोबर केले नाही. त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, विराटने स्लेजिंग करण्यापूर्वी बेयरस्टोचा स्ट्राईक रेट २१ होता आणि स्लेजिंग केल्यानंतर त्याचा स्ट्राईक रेट १५० झाला. सेहवागने असेही लिहिले की, “पुजारासारखा खेळत होता, विराट कोहलीने विनाकारण स्लेजिंग करून पंत बनवून टाकले.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला
स्म्रीती-शेफालीच्या झंझावाती खेळी, १७४ धावांच्या अभेद्य भागीदारीसह भारताला जिंकून दिली वनडे मालिका
पाचवी कसोटी संपण्यापूर्वी सिराज भावूक; म्हणाला, ‘इंग्लंडविरुद्धचा मालिका विजय अविस्मरणीय..’