---Advertisement---

सुपर ओव्हरमध्ये दिल्लीची बाजी; दिग्गज संतापून म्हणाला, ‘तो टॉयलेटला गेला होता का, फलंदाजीला पाठवलं नाही’

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 11:20 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत चाहते डबल हेडर सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातही जर त्यांना सुपर ओव्हर पाहायला मिळाली तर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होऊन जातो. असेच काहीसे चित्र रविवारी (२५ एप्रिल) पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात जडेजाची तुफान फटकेबाजी पाहून झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हर सामन्याचा थरार पाहायला मिळाला.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. परंतु सुपर ओव्हर चालू असताना हैदराबाद संघाने जॉनी बेअरस्टोला फलंदाजीसाठी न पाठवल्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने आश्चर्य व्यक्त करत मजेशीर ट्विट केले आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली संघाकडून पृथ्वी शॉच्या ५३ आणि रिषभ पंतच्या ३७ धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी १५९ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून केन विलीयमसनने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली होती. तर जॉनी बेअरस्टोने ३८ धावा केल्या होत्या. २० षटकअखेर हैदराबाद संघाला देखील १५९ धावा करण्यात यश आले होते.

यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. यावेळी हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि केन विलियमसन या दोघांना फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. या दोघांनी मिळून अवघ्या ७ धावा केल्या होत्या. ८ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली संघाकडून रिषभ पंत आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनी दिल्ली संघाला शेवटच्या चेंडूवर १ धावाची आवश्यकता असताना १ धाव करत सामना जिंकून दिला होता.

https://twitter.com/virendersehwag/status/1386383873588662278?s=20

सेहवागनं केलं मजेशीर ट्विट
सुपर ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोला फलंदाजी करण्यासाठी न पाठवल्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘मला वाटतं बेअरस्टो टॉयलेटला गेला असेल. मला हे नाही समजले की त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी का नाही पाठवले. त्याने १८ चेंडूत ३८ धावांची तुफानी खेळी केली होती. मला तर वाटते की, तो एक उत्कृष्ट हिटर आहे. तस तर हैदराबाद संघाने चांगली झुंज दिली. परंतु त्यांचा पराभव त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झाला आहे.’

महत्वाच्या बातम्या-

सिराजला हलक्यात घेणाऱ्या जडेजाला वेगवान गोलंदाजाने ‘अशी’ दाखवली भिती, पाहा व्हिडिओ

विजयाच्या आनंदावर पसरलं दु:खाचं सावट, सीएसकेतील ‘या’ प्रमुख सदस्याची मालवली प्राणज्योत

सुपर ओव्हरचा इतिहास: आजवर ‘इतक्यांदा’ आयपीएलमध्ये झाली आहे सुपर ओव्हर; पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---