टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतो. मात्र क्रिकेटच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा सेहवाग आता राजकीय मैदानावर फटकेबाजी करण्याच्या मूडमध्ये आहे. सेहवाग निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. हा संपूर्ण मामला काय आहे? हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
वास्तविक, वीरेंद्र सेहवाग आता राजकारणात उतरण्याच्या तयारीत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. सेहवागबाबत दावा केला जातोय की, तो हरियाणातील काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करत होता. क्रिकेट प्रशासकापासून नेते बनलेले अनिरुद्ध चौधरी हरियाणातील तोशाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अनिरुद्ध बीसीसीआयचे खजिनदार होते. हरियाणा विधानसभेची निवडणूक 5 ऑक्टोबरला होणार आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जातोय की, सेहवागनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो काँग्रेसच्या अनिरुद्ध चौधरी यांचं समर्थन करत होता. व्हिडिओमध्ये एक ट्रॅक्टर रॅली दिसत आहे. सेहवागच्या या व्हिडिओवरून तो काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सेहवागच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही. सध्या सेहवागच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही स्टोरी नाहीशी झाली आहे. आता सेहवाग राजकीय मैदानात उतरतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ येथे पाहू शकता.
वीरेंद्र सहवाग हरियाणा में कांग्रेस प्रत्याशी अनिरुद्ध चौधरी के लिए वोट मांग रहे हैं।
वीरेंद्र सहवाद ने अपने इंस्टाग्राम अकाउंट पर तोशाम विधानसभा से कांग्रेस प्रत्याशी को वोट देने की अपील करने वाली रील स्टोरी पर लगाई। pic.twitter.com/w5NOabDo7s
— Dr Monika Singh (@Dr_MonikaSingh_) September 24, 2024
सेहवागनं आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीच्या 180 डावांमध्ये त्यानं 49.34 च्या सरासरीनं 8586 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 23 शतकं आणि 32 अर्धशतकं निघाली. याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या 245 डावांमध्ये त्यानं 35.05 च्या सरासरीनं 8273 धावा केल्या, ज्यात 15 शतकं आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 इंटरनॅशनलच्या 18 डावांमध्ये सेहवागनं 394 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 145.38 होता.
हेही वाचा –
गुरबाजचा धमाका! आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, अशी कामगिरी करणारा पहिलाच अफगाणी खेळाडू
बीसीसीआयचा अचानक मोठा निर्णय, हे 3 खेळाडू दुसरी कसोटी खेळणार नाहीत
कुलदीपला संधी, सिराज ड्रॉप होणार? बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?