पुणे। भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो भारताच्या सामन्यानंतर अनेकदा आपली प्रतिक्रिया सोशल मीडियामधून व्यक्त करत असतो. त्याने शुक्रवारी(२६ मार्च) रात्रीदेखील भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर ट्विटरवर मीम शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्याला ते ट्विट त्याला डिलिट करावे लागले.
नक्की काय आहे प्रकरण?
शुक्रवारी दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ६ विकेट्सने विजय मिळवला. या दरम्यान इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक अंदाजात फलंदाजी केली होती. इंग्लंडच्या केवळ ४ फलंदाजांनी मिळून तब्बल २० षटकार मारले.
त्यामुळे भारतीय गोलंदाजांचे हाल पाहून सेहवागने सामन्यानंतर एक ट्विट केले, ज्यात त्याने एक मीम शेअर केले होते. त्या मीममध्ये प्रसिद्ध पत्रकार अर्णव गोस्वामीचा फोटो होता आणि त्यावर लिहिले होते की ‘मुझे मारा गया है (मला मारण्यात आले आहे).’ तसेच या मीमला सेहवागने कॅप्शन दिले होते की ‘आज भारतीय गोलंदाज’.
मात्र, सेहवागने हे ट्विट केल्यानंतर त्याच्यावर अर्णव गोस्वामी समर्थकांनी टीका करण्यास सुरुवात केली. अखेर काहीवेळानंतर सेहवागने हे ट्विट डिलिट केले. सेहवागने शेअर केलेल्या ट्विटमधील अर्णव गोस्वामीचा फोटो त्यावेळचा आहे, ज्यावेळी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
सेहवागने हे ट्विट डिलिट केल्यानंतरही चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. एका ट्विटरकर्त्याने सेहवागच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले की ‘भीती सर्वांना वाटते’. दुसऱ्या एका ट्विटर कर्त्याने लिहिले की ‘विरेंद्र सेहवाग पाजी कुठून फोन आला का?’ तसेच यासारखे आणखी काही प्रतिक्रिया ट्विटरकर्त्यांनी दिल्या आहेत.
Dar sabko lagta hain… pic.twitter.com/VHIwuRMkjS
— Mohammed Zubair (@zoo_bear) March 26, 2021
https://twitter.com/BhaagHaters/status/1375511673277014018
@virendersehwag paaji phone aagaya kya kahi se?#INDvsENG #INDvENG #ArnabGoswami https://t.co/b5qIfw1kRB
— Anmol Mahajan (@anmolmufc) March 26, 2021
https://twitter.com/KnchnDs3/status/1375530432666640384
Doesn't matter how much impactful celebrity u r!! Never mock , abuse, tease or make fun of #ArnabGoswami @itsSSR @narendramodi
Pakki dhulai hi hmari pehchan hai 😁@virendersehwag good nyt nd get well soon 👍— 𝕶𝖆𝖑𝖎𝖓𝖉𝖊𝖊 𝕭𝖍𝖆𝖗𝖌𝖆𝖛𝖆 (@KalindeeA) March 26, 2021
हाहाहा ….. #ArnabGoswami 🤭 https://t.co/UfDJoTdGwH
— Adil (@khanadilOfficia) March 26, 2021
Shamelessly You r mocking someone's pain,it was not expected @virendersehwag pajji 🤬🤬#ArnabGoswami#VirenderSehwag
Sushant In Our Hearts pic.twitter.com/F3SXtINy1A— BeingYash🇮🇳 (@bEiNgSaNn) March 26, 2021
https://twitter.com/dearSakshi1/status/1375512966821343236
इंग्लंडने सामना जिंकत केली मालिकेत बरोबरी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर इंग्लंडने दुसरा सामना ६ विकेट्सने जिंकला. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (२८ मार्च) होणारा मालिकेतील शेवटचा सामना निर्णायक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन तेंडुलकरआधी ‘या’ क्रिकेटपटूंना झाला होता कोरोना, पाहा यादी
INDvENG: तिसऱ्या वनडेत ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; दोघांना मिळू शकतो डच्चू