भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला आयपीएल 2020 मधील किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र, दुखापतीनंतरही तो आयपीएलमधील मुंबईच्या सामन्यांमध्ये मुंबई संघातील इतर खेळाडूंसोबत डगआऊटमध्ये दिसला. त्यामुळे भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने यावर आक्षेप घेत त्याच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
रोहितला नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय संघात दुखापतीमुळे स्थान देण्यात आलेले नाही.
संघात निवड न होण्याचा निर्णय कठोर -सेहवाग
एका वेबसाईटच्या प्रतिनिधींशी बोलताना सेहवाग म्हणाला की, “आमच्या काळात जेव्हा के श्रीकांत मुख्य निवडकर्ता होते, तेव्हा दुखापतग्रस्त खेळाडूची संघात निवड केली जात नव्हती. ऑस्ट्रेलिया दौरा दीर्घकाळ असेल. रोहित शर्मा हा भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. जर दुखापतीमुळे या दौऱ्यावर त्याची निवड झाली नसेल, तर हा एक कठोर निर्णय आहे.”
सराव करत असल्याचा व्हिडीओ झाला होता व्हायरल
विशेष म्हणजे सोमवारी(26 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जेव्हा संघाची निवड झाली, तेव्हा रोहित जखमी असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचवेळी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळात मुंबई इंडियन्सने रोहित सराव करत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला होता. त्यामुळे प्रत्येकाला प्रश्न पडला होता की, जर रोहित तंदुरुस्त नसेल तर तो सराव कसा करू शकतो.
4️⃣5️⃣ seconds of RO 4️⃣5️⃣ in full flow!🔥#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/65ajVQcEKc
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
Just what we love to see! Hitman in action at today’s training 😍#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL @ImRo45 pic.twitter.com/FBYIyhtcOW
— Mumbai Indians (@mipaltan) October 26, 2020
….स्पष्ट आहे की तो दुखापतग्रस्त नाही
रोहित शर्माच्या स्टेडियममधील उपस्थितीबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला की, “सध्या माझ्याकडेही रोहित शर्माच्या दुखापतीविषयी काही माहिती नाही. हा प्रश्न माध्यमांनी विचारला पाहिजे. यापूर्वी असे सांगितले गेले होते की, तो दुखापतग्रस्त आहे. जर तो दुखापतग्रस्त असेल, तर तो स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान काय करीत होता. मुंबईने खेळलेल्या मागील दोन्ही सामन्यादरम्यान त्याला पाहिले गेले आहे. जर तो दुखापतग्रस्त असेल तर त्याने विश्रांती घ्यावी जेणेकरून तो लवकरात लवकर बरा होईल. याचा स्पष्ट अर्थ आहे की तो दुखापतग्रस्त नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
“सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाच्या फ्लाइटमध्ये असायला हवे”
IPL 2020:… म्हणून हार्दिक पंड्या आणि ख्रिस मॉरिसला मॅच रेफ्रीने दिला इशारा, पाहा व्हिडीओ
“निवडकर्त्यांनी सूर्यकुमारची खेळी पहिली असावी…” माजी दिग्गजाने निवड समीतीला फटकारले