ट्विटर किंवा अन्य माध्यमातून देशातील कोणत्याही घटनेवर सडेतोड उत्तर देणाऱ्या वीरेंद्र सेहवागने प्रशिक्षक निवडीवर भाष्य करण्यास मात्र नकार दिला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गेल्या आठवड्यात रवी शास्त्री यांची निवड झाली आहे.
भारतीय संघाचा ह्या माजी स्फोटक फलंदाजाने भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता. सेहवागबरोबर रवी शास्त्री, टॉम मुडीसह अन्य २ दिग्गज या स्पर्धेत होते. परंतु या सर्वांवर मात करत रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले.
उम्मीद या आपल्या खेळाडूंना साहाय्य करणाऱ्या उपक्रमानिम्मित सेहवाग मुंबईला आला असताना त्याने मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य प्रश्नांना उत्तर देणं कटाक्षाने टाळले.