भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023मध्येही चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. यावर्षी धोनी आपली शेवटची आयपीएल खेळत असल्याचे मागच्या बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. मात्र बुधवारी (3 मे) समालोचक डॅनी मॉरिसन यांच्या प्रश्नावर धोनीने खास उत्तर देत आयपीएल निवृत्तीबाबत संशय व्यक्त केला. धोनीच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवान यानेही धोनीला वारंवार निवृत्तीविषयी विचारणे योग्य नसल्याचे सांगितले.
आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू झाल्यापासून एमएस धोनी (MS Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. यादरम्यान धोनीलाही अनेक पत्रकार आणि क्रिकेटच्या जाणकारांनी निवृत्तीविषयी प्रश्न विचारले. याच पार्श्वभूमीवर विरेंद्र सेहवाग () याने आपले मत मांडले. सेहवागच्या मते धोनी या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्तीच्या विचारत जरी असला, तरी अशा प्रश्नांची उत्तरे देणे त्याने टाळले पाहिजे. सेहवागच्या मते धोनीला जेव्हा वाटेल, तेव्हा तो स्वतः याविषयी माहिती देईल.
एका कार्यक्रमात बोलताना सेहवाग उपस्थितांसोबत धोनीविषयी चर्चा करत होता. यावेळी तो म्हणाला, “मला समजत नाही की, लोक असे प्रश्न विचारतात कशासाठी? हा त्यांचा निर्णय आहे, त्याला घेऊ द्या. मला वाटते या सर्वांना फक्त धोनीकडून याची पुष्टी करून घ्यायची आहे की, ही त्याची शेवटची आयपीएल आहे. पण हे त्याचे शेवटचे वर्ष आहे की नाही, हे फक्त धोनीलाच माहिती आहे.”
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामना बुधवारी (3 मे) लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला गेला. सामना सुरू होण्याआधीच याठिकाणी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे खेळ सुरू होण्यासाठी 15 मिनिटे उशीर झाला. धोनीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रतम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊने 19.2 षटकात 7 बाद 125 धावा केल्या होत्या. पण तितक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि लखनऊचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.सीएसके संघ या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार होता, मात्र पावसाने खेळ बिघडवला. सामना रद्द केल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण दिला गेला. (Virender Sehwag said that asking MS Dhoni about retirement is not right)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू
एका ओव्हरमध्ये 36 नाही, तर फलंदाजाने चोपल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा, व्हिडिओ पाहून तोंडात घालाल बोटे