कोरोना महामारीदरम्यान छत्तीसगड राज्यातील रायपुर शहरात रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळवली जात आहे. गतवर्षी मुंबईत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोविड-१९ मुळे ४ सामने खेळवल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ५ मार्चपासून पुन्हा सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय दिग्गजांसह माजी परदेशी क्रिकेटपटूही जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. दरम्यान इंडिया लींजेड्स संघाचे प्रतिनिधित्त्व करत असलेल्या सचिन तेंडूलकर याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे.
इंडिया लीजेंड्स विरुद्ध इंग्लंड लीजेंड्स हे संघ मंगळवारी (०९ मार्च) आमनेसामने येणार आहेत. तत्पुर्वी माजी भारतीय विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मास्टर ब्लास्टर सचिनचा एक व्हिडिओ ट्विटटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन फिजिओसोबत बसल्याचे दिसत आहे.
सेहवाग दृश्याचे स्पष्टीकरण देताना सांगतो की, “आपल्यापुढे क्रिकेटचा देव (सचिन) बसला आहे. आताही तो क्रिकेट खेळण्यापासून माघार घेत नाहीये. नुकतीच त्याला सुई टोचवण्यात आली आहे. अशा अवस्थेतही तो क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.”
पुढे सेहवाग युवराजला सचिनबाबत विचारतो. यावर युवराज म्हणतो की, “विरू तू शेर आहेस, तर सचिन बब्बर शेर आहे.”
सेहवागने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सचिनचे क्रिकेटप्रेम आजतायत टिकून असल्याचे पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1368925312386441224?s=20
सचिन, सेहवाग आणि युवराज यांचा इंडिया लीजेंड्स संघ आतापर्यंत ३ सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. रायपुर येथे झालेल्या सामन्यात इंडिया लींजेड्सने प्रतिस्पर्धी बांग्लादेश लीजेंड्सला १० विकेट्सचे पराभूत केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघाने १०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल विरेंद्र सेहवागने ३५ चेंडूत नाबाद ८० धावांची तूफानी खेळी केली होती. तर सचिन तेंडूलकरने २६ चेंडूत नाबाद ३३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
तत्पुर्वी इंडिया लीजेंड्सने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका लीजेंड्सला पराभूत केले होते. अशाप्रकारे आतापर्यंतचे ३ सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थानी ताबा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या हंगामात ‘थाला’ची सेना उतरणार नव्या अंदाजात, पाहा सीएसकेची नवीकोरी जर्सी
पीटी शिक्षक ते जगातील एक नंबरचा गोलंदाज असा प्रवास करणारा सॅम्युअल बद्री
आयपीएल २०२१ चं वेळापत्रक झालं घोषित; पंजाब किंग्जची मालकीण म्हणते, ‘हे थोडं विचित्र वाटतंय’