---Advertisement---

काय म्हणला सेहवाग धोनीच्या कालच्या खेळीबद्दल की ज्यामुळे त्याचे ट्विट झाले हिट

On: गुरूवार, फेब्रुवारी 22, 2018 6:07 PM
---Advertisement---

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तसाच त्याच्या हटके शैलीतील ट्विटसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने अनेकदा त्याच्या अनेक सहकाऱ्यांना विनोदी ट्विटकरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

अशाच प्रकारे कालही त्याने कॅप्टन कूल धोनीने केलेल्या अर्धशतकाबद्दल कौतुक करताना ट्विट केले आहे. हे ट्विट क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलेच वायरल झाले. या ट्विटसाठी त्याला ३,५०० पेक्षा जास्त रिट्विट आणि २८००० पेक्षा जास्त लाईक्स आल्या आहेत.

काल धोनीने २८ चेंडूत नाबाद ५२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्याबरोबरच मनीष पांडेनेही काल नाबाद ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. हे दोघांचेही आंतराष्ट्रीय टी २० तील दुसरे अर्धशतक आहे.

याबद्दल त्यांचे कौतुक करताना सेहवाहने ट्विट केले आहे की “शेवटच्या ४ षटकात ५५ धावा. हत्यार चालवायला नाही विसरला. महेंद्रसिंग धोनी या खास खेळाडूंकडून खास खेळी झाली. पांडेनेही चांगला खेळ केला. १८८ धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांना शुभेच्छा”

याबरोबरच धोनीने भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जलद अर्धशतक करण्याच्या शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या दोघांनीही २७ चेंडूत अर्धशतक केले आहे.

धोनी आणि पांडे या दोघांच्याही अर्धशतकानंतरही भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पण तरीही धोनी आणि पांडेच्या खेळीचे सर्वच स्थरातून कौतुक झाले आहे.

https://twitter.com/Varun_dvn/status/966364976406437889

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment