आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी अत्यंत सुमार झालेली आहे. दिल्लीला स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नाही. दिल्लीने खेळलेल्या पाचही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर व खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक वीरेंद्र सेहवाग याने खेळाडूंना यासाठी कारणीभूत न धरता मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांना पराभवाची जबाबदारी घेण्यास सांगितले.
दिल्ली कॅपिटल्स या हंगामात नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सहभागी झाली. मात्र, वॉर्नर याच्यासारखा अनुभवी कर्णधार संघाची किस्मत बदलू शकला नाही. दिल्लीला पहिल्याच सामन्यात लखनऊने पराभूत केले. त्यानंतर गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्यांना अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागलेला. त्यानंतर आरसीबीने देखील त्यांना मात दिली.
संघाच्या या खराब कामगिरीवर बोलताना सेहवाग म्हणाला,
“जेव्हा संघ जिंकत असतो त्यावेळी आपण प्रशिक्षकाला त्याचे श्रेय देतो. आता संघ पराभूत होत आहेत तेव्हाही ही जबाबदारी प्रशिक्षकांनी घ्यायला हवी. आपण अनेकदा रिकी पॉंटिंग याचे कौतुक करतो. त्याने संघासह उत्कृष्ट काम केले आहे. संघ त्याच्याच मार्गदर्शनाखाली अंतिम फेरीतही पोहोचला होता. दरवर्षी संघ प्ले ऑफमध्ये देखील पोहोचला. आता संघाच्या वाईट काळातही त्यानेच ही जबाबदारी स्वीकारायला हवी.”
रिकी पॉंटिंग 2019 पासून दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली दिल्लीने 2020 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला. तसेच सलग तीन वर्ष दिल्ली प्ले ऑफमध्ये देखील पोहोचली होती.
(Virendra Sehwag Said Ricky Ponting Should Take Responsibility Of Delhi Capitals Five Defeat In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तो काय म्हणाला? नितीश राणा-ऋतिक शौकीनचा वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय
वाह रे वेंकटेश! शानदार अय्यरचा वानखेडेवर शतकी धमाका, मॅकलमनंतर केवळ दुसराच ‘नाईट रायडर’