भारत व पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा बहुप्रतिक्षित सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पाच गड्यांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयानंतर अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेदेखील एक ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच सामनावी ठरलेल्या हार्दिक पंड्या याचे विशेष कौतुक त्याने या ट्विटमध्ये केलेले दिसते.
मागील वर्षी टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तान कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यातील भारताच्या विजयानंतर सेहवागने ट्विट करत लिहिले,
‘वा वा वा.. अप्रतिम हार्दिक पंड्या. सर्व काही मीच करणार. भुवनेश्वरची शानदार कामगिरी आणि जड्डू कोहलीच्या उपयुक्त खेळ्या. खूप दिवसानंतर भारत आणि पाकिस्तानची काट्याची लढत पाहायला मिळाली. मस्त मजा आ गया’
Wow wow wow ! Fantastic Hardik Pandya. Sab kuchh main karega. Brilliant performance by Bhuvi, good hand by Jaddu and Kohli as well.
Glad to see a close #INDvsPAK match after a long time. Mast maza aa gaya. pic.twitter.com/HLNrnLRpK8— Virender Sehwag (@virendersehwag) August 28, 2022
दोन्ही संघांमध्ये पुढील रविवारी देखील सामना होऊ शकतो. आशिया चषकाच्या प्रारूपानुसार सुपर फोरमध्ये हे संघ दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केल्यास अंतिम सामना देखील याच संघांमध्ये होऊ शकतो.
उभय संघातील या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार तर हार्दिक पंड्याने तीन बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. गोलंदाजांच्या या उत्कृष्ट कामगिरीमूळे पाकिस्तानचा डाव 147 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात, भारताची सुरुवात ही खराब झाली. राहुल शून्यावर माघारी परतला. तर, जम बसल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव माघारी परतले. मात्र, अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांनी फलंदाजी आपले मोलाचे योगदान देत भारताचा विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धचा पराभव माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या जिव्हारी; म्हणाला, ‘आझमला कॅप्टन का बनवलंय’
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ