---Advertisement---

त्यावेळी मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लिश कर्णधाराला टोला

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर उपहासात्मक टिप्पणीद्वारे इंग्लंड आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गनची खिल्ली उडवली आहे. कोलकाता नाईट रायडर्स  आणि दिल्ली कॅपिटल्स संघा दरम्यान नुकत्याच मंगळवारी (२८ सप्टेंबर) झालेल्या आयपीएल सामन्याच्या एका घटनेवर ४२ वर्षीय सेहवागने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही घटना घडली. केकेआरचा राहुल त्रिपाठीने चेंडू फेकला, पण चेंडू रिषभ पंतच्या बॅटला लागून दुसरीकडे गेला. त्यानंतर अश्विन-पंत यांनी अतिरिक्त धाव घेतली. केकेआरचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने सामन्यानंतर संपूर्ण घटना सांगितली.

त्याने सांगितले की मॉर्गन अशा प्रकारचा क्रिकेटपटू नाही, ज्याला फलंदाजाला किंवा त्याच्या बॅटला चेंडू लागून गेलेल्या ओव्हर थ्रोवर फलंदाजाने अतिरिक्त धाव घेतलेली आवडते. त्याला वाटते फलंदाजाने खिलाडूवृत्ती दाखवून धाव घेऊ नये.

कार्तिकच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वीरेंद्र सेहवागने एका प्रसंगाची आठवण करून दिली की, कसे इंग्लंडने आयसीसी २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ओव्हर थ्रोवर चार धावा मिळवल्या. चेंडू कसा बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषा ओलांडून गेला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचकारी अंतिम सामन्याचा हा निर्णायक पैलू ठरला होता.

सेहवागने इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनची खिल्ली उडवत असे म्हटले की, इंग्लंडच्या कर्णधाराने २०१९ च्या विश्वचषकानंतर लॉर्ड्सच्या बाहेर आंदोलन करायला हवे होते, जर त्याने फलंदाजी करणाऱ्या संघाचे समर्थन करायचे नव्हते तर. माजी भारतीय क्रिकेटपटूने असेही म्हटले की, मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता.

सेहवागने ट्वीट केले, ‘ १४ जुलै २०१९ ला, जेव्हा बेन स्टोक्स शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना चेंडू त्याच्या बॅटला लागून सीमेपार गेला, तेव्हा मॉर्गनने लॉर्ड्सच्या बाहेर आंदोलन केले होते आणि विश्वचषक घेण्यास नकार दिला आणि न्यूझीलंड विश्वचषक जिंकला होता. नाही का? मोठे आले, समर्थन न करणारे.’

ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली आहे. पूर्वार्धात त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. केकेआरने मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. केकेआरच्या गोलंदाजांनी शारजाहमध्ये दिल्लीला १२७ धावांवर रोखले. यानंतर, केकेआरने १९ व्या षटकात तीन विकेट शिल्लक असताना लक्ष्य गाठले. सध्या ११ सामन्यांनंतर कोलकाता गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्य़ा –

“सौरभ तिवारीकडे बघितले तर तो सूर्यकुमार आणि इशानपेक्षा धावा काढण्याची जास्त भूक दाखवत आहे”

स्कूप शॉटच्या नादात स्मिथने स्वत:लाच लागून घेतला चेंडू, मग केली अशी कृती की, मीम्स होतायेत व्हायरल

अश्विनला दोषी ठरवणाऱ्या वॉर्नला भारतीय चाहत्यांनी दाखवला आरसा; करून दिली ‘त्या’ प्रकरणाची आठवण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---