कतार येथे खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात फ्रांस आणि अर्जेंटिना हे दोन बलाढ्य लुसेल स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्यात कोण वरचढ ठरेल याची चर्चा सुरू असताना फ्रांसला मोठा धक्का बसला आहे. दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघाचे काही खेळाडू आजारी पडले आहेत. या अतिमहत्वाच्या सामन्याला काही तासांचा अवधी शिल्लक आहे.
किंग्सले कोमन, इब्राहिमा कोनाटे आणि राफेल वाराने हे ते खेळाडू आहेत जे एका व्हायरसच्या विळख्यात आले आहेत. यांनी फ्रान्सच्या उर्वरित संघापासून दूर सराव केला. व्हायरसमुळे त्यांची विश्वचषक अंतिम सामन्याची तयारी विस्कळीत झाली आहे.
अर्जेंटिना 36 वर्ष विश्वचषकाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे फ्रांस सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या हेतून मैदानात उतरणार आहे. फ्रेंच मीडियाच्या रिपोर्टनुसार, फ्रांसच्या संघातील अनेक महत्वाचे खेळाडू एका व्हायरसच्या विळख्यात आले आहेत.
वॅरने आणि कोनाटे हे शुक्रवारी (16 डिसेंबर) सरावाला आले नाही. हे दोघेही मोरोक्को विरुद्धच्या उपांत्य सामन्यात अंतिम अकराचा भाग होते. ज्यामध्ये संघाने 2-0 ने विजय मिळवला.
उपांत्य फेरीआधीही 3 खेळाडू होते आजारी
रिपोर्ट्सनुसार, वॅरनेमध्ये त्या व्हायरसची अधिक लक्षणे दिसली नाहीत, तर कोनाटे पूर्ण दिवस रुममध्येच होता. ज्यामुळे फ्रांस संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. उपांत्य सामन्याआधीही डिफेंडर डेयट उपामेकानो, मिडफिल्डर एड्रियन रॅबियो आणि विंगर किग्सले कोमन हे आजारी होते, ज्यामुळे ते मोरोक्को विरुद्ध खेळू शकले नाही.
आजारानंतर फिटनेसचीही चिंता
ही स्पर्धा सुरू होण्याआधीच फ्रांसचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि विश्वचषकातून बाहेर झाले. त्यामध्ये पॉल पोग्बा, एनगोलो कांटे आणि करिम बेंझेमा यांचा समावेश आहे. तसेच पहिल्याच सामन्यात लुकास हर्नांडेज दुखापतग्रस्त होत स्पर्धेबाहेर झाला. एवढ्या अडचणी असूनसुद्धा फ्रांस सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BANvIND Test: पाच विकेट्स घेतल्यानंतर कुलदीप यादव झाला भावूक! म्हणाला, ‘दोन वर्ष झाली…’
नॉर्थ ईस्ट युनायटेड अजूनही पहिल्या गुणाच्या शोधात; एफसी गोवाला देणार आव्हान