गॉर्जिया : माजी विश्वविजेता भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकात सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आनंदच सामना मलेशियाच्या इंटरनॅशनल मास्टर ली तियान योह याच्यासोबत होणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे.
या स्पर्धेत एकूण १२८ ग्रँडमास्टर सहभागी होत आहेत. बल्गेरियाचा ग्रँड मास्टर वेसेलीन टोपालोव्ह हा एकमेव खेळाडू आहे जो जागतिक मानांकनात पहिल्या २० खेळाडूंमध्ये असून देखील या स्पर्धेत सहभागी नाही. जागतिक मानांकनानुसार सध्याचा विश्वविजेता खेळाडू मॅग्नस कार्लसन हा पहिल्या क्रमांकावर आहे.
पुढे होणाऱ्या कॅन्डीडेट टूर्नामेंटच्या दृष्टीने या स्पर्धेचे महत्व अधिक आहे. या स्पर्धेतील दोन खेळाडू विश्वविजेते पदासाठी मॅग्नस कार्लसन समोर आपली दावेदारी ठेवतील. जर कार्लसन आणि सर्गेई कर्जाकिन या दोंघांपैकी जर कोणी अंतिम सामन्यात खेळेल किंवा हे दोघेच अंतिम सामन्यात खेळले तर सेमीफायनल मध्ये ज्यांना या दोन खेळाडूंनी हरवले आहे ते खेळाडू कॅन्डीडेट टूर्नामेंटसाठी पात्र ठरतील.
भारतीय ग्रँड मास्टर जे बुद्धिबळ विश्वचषक सहभागी झाले आहेत
# १ विश्वनाथन आनंद
# २ पी. हरी क्रिष्णा
# ३ विदीत गुजराती
#४ एस. पी. सेथुरामन
# ५ एम. कार्थिकेयन