---Advertisement---

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पहायला मिळाली एकाच दिवशी टी२०मध्ये दोन तुफानी शतकं

On: शनिवार, ऑगस्ट 29, 2020 8:04 AM
---Advertisement---

मुंबई । कोरोना विषाणूनंतर आता क्रिकेटला वेग आला आहे.  इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झाल्यानंतर कॅरेबियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे आणि आता लवकरच आयपीएल सुरू होणार आहे. त्यासोबत इंग्लंडमध्ये टी -20 ब्लास्टलाही सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी चाहत्यांना चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. नॉर्थ ग्रुपमध्ये खेळणार्‍या लँकाशर आणि साऊथ ग्रुपमधील संघ मिडिलसेक्सच्या सलामीच्या फलंदाजांनी शानदार शतके झळकावली आहेत.

लॅन्काशायरच्या संघाचा चेस्टर ली स्ट्रीटवर डरहॅमचा सामना झाला. सलामीवीर कीटॉन जेनिंग्जने केवळ 63 चेंडूत 108 धावा फटकावल्या. शतकी खेळीत जेनिंग्जने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले. डाव्या हाताच्या फलंदाजाचा स्ट्राइक रेट 171.42 होता. जेनिंग्सच्या टी -20 कारकीर्दीचे हे पहिले शतक आहे.  जेनिंग्सने त्याचा सहकारी सलामीवीर अ‍ॅलेक्स डेव्हिससह पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली.

एकीकडे लॅन्सेट्सच्या कीटॉन जेनिंग्जने फलंदाजीचे शतक ठोकले तर दुसरीकडे मिडलसेक्सचा फलंदाज मॅक्स होल्डननेही चेम्सफोर्ड मैदानावर शतक ठोकले.  एसेक्सविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात मॅक्स होल्डनने 60 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या.  होल्डनने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 170 होता.  22 वर्षीय डावखुरा फलंदाज फक्त 8 वा टी -20 सामना खेळत होता आणि टी -20 मध्ये प्रथमच शतक ठोकले. कोरोना व्हायरसनंतर टी -20 क्रिकेटमध्येही हे पहिले शतक आहे.

कोरोना विषाणूनंतर वेस्ट इंडिजमध्ये मागील 9 दिवसांपासून कॅरेबियन प्रीमियर लीग सुरू आहे. पण आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने शतक ठोकलेले नाही. टी -20 ब्लास्टच्या पहिल्याच दिवशी एक नव्हे तर दोन फलंदाजांनी शतक ठोकले.  टी -20 ब्लास्टमध्ये आणखी शतके होतील हे स्पष्ट आहे. या स्पर्धेचा इतिहास असाच काहीसा आहे.  यानंतर इंडियन प्रीमियर लीग 19 सप्टेंबरपासून सुरू होईल, जिथे जगातील सर्वोत्तम फलंदाज खेळताना दिसतील. येथेही शतकांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---