केंट आणि सोमरसेट या दोन संघांमध्ये विटालिटी ब्लास्टचा अंतिम सामना पार पडला. सामन्यादरम्यान सीमारेषेबर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने अप्रतिम झेल घेतला, पण फलंदाज बाद झाला नाही. अंपायरने फलंदाजाला नाबाद करार देत त्याच्या खात्यात ६ धावांची वाढ केली.
सामन्यामध्ये केंटने २० षटकांमध्ये सोमरसेटसमोर १६८ धावांचे आव्हान रचले होते. यावेळी सोमरसेटच्या फलंदाजीदरम्यान ११ व्या षटकासाठी केंटचा जो डेन्ली गोलंदाजी करण्यासाठी आला होता. विल स्मिड फलंदाजी करत होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. त्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्मिडने डीप मिडविकेटकडे मोठा शाॅट मारला. चेंडू स्मिडच्या बॅटच्या नीट संपर्कात आला नव्हाता आणि तो सरळ डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जाॅर्डन काॅक्सडे आला. काॅक्सने कोणतीच चूक न करता आणि चेंडू अप्रतिमरित्या झेलला. मात्र, अंपायरने फलंदाजाला बाद करार दिला नाही.
खेळाडूने अप्रतिम झेल पकडली, पण फलंदाज बाद झाला नाही
सामन्यादरम्यान काॅक्सने जेव्हा चेंडू झेलला, त्यावेळी डेनियल बेलनेही झेल पकडण्यासाठी डाइव मारली होती. मात्र, तो स्वत:वर संयम ठेऊ शकला नाही आणि काॅक्सला जाऊन धडकला आणि सीमारेषेच्या संपर्कात आला. त्यानंतर झेल बरोबर पकडली गेली आहे, की नाही हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेतली गेली.
व्हिडोओ रिप्लेमध्ये दिसले की, काॅक्सने झेल तर घेतली होती, पण तो त्याच्या शरीरावर पूर्णपण नियंत्रण मिळवू शकला नव्हता. झेल पकडण्यासठी आलेला दुसरा खेळाडू डेनियल काॅक्सशी धडकलेला दिसले आणि त्यावेळी त्याच्या पायाचा सीमारेषेला स्पर्श झाल्याचे दिसले. यामुळे अंपायरने फलंदाजाला बाद घोषित करण्याऐवजी षटकार घोषित केला.
Out or not? 🤔#Blast21 #FinalsDay pic.twitter.com/J8luyZMV6o
— Vitality Blast (@VitalityBlast) September 18, 2021
दरम्यान, आयसीसीच्या नियमांप्रमाणे झेल घेण्याची वेळ तेव्हापासून सुरू होते, जेव्हा खेळाडू पहिल्यांदा चेंडूला स्पर्श करतो आणि तेव्हा संपतो जेव्हा खेळाडू चेंडू झेलून स्वत:वर पूर्ण नियंत्रण मिळवतो. काॅक्सबाबत असेच घडले, तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याचा सहकारी खेळाडू सीमारेषेच्या संपर्कात आल्यामुळे अंपायरने हा षटकार असल्याचे घोषित केले आहे. नियमांप्रमाणे जर खेळाडू झेल घेतल्यानंतर स्वत:वर नियंत्रण मिळवू शकला नाही, तरी तो षटकार घोषित केला जातो.
हा सामना केंटने जिंकला. सोमरसेटला २० षटकांत ९ बाद १४२ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
यूएईतील ‘या’ स्टेडियममध्ये १६ वर्षांखालील प्रेक्षकांना नाही प्रवेश, जाणून घ्या इतर स्टेडियमचे नियम