पुणे । मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाच्या सचिवपदी महाराष्ट्राचे विठ्ठल शिरगावकर यांची, तसेच सुनील पुर्णपात्रे यांची सलग तिसºया वर्षी फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सत्यवीर सिंग यांची खजिनदारपदी निवड झाली आहे.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव सरदेसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनतर्फे दिग्विजय सिंग यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाची वार्षिक बैठक आणि निवडणुका पुण्यामध्ये झाल्या. यामध्ये कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात आली. भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे यावेळी उपस्थित होते.
निवडणुकीमध्ये फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब लांडगे, राजेश मिश्रा, बिपीन सुयर्वंशी, बालविनायकम यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी जितेंद्र खासनीस, जितेंद्र चाबुकस्वार, क्रिश्नय्या के. , विनय मराठे यांची निवड करण्यात आली आहे.
सभेमध्ये यावर्षी होणाºया विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. यावर्षी फेडरेशनची बायथल-ट्रायथल स्पर्धा पुण्यात होणार आहे. तर राष्ट्रीय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा हरियाणा येथे होणार आहे. राष्ट्रीय लेजर रन स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी आयोजनाची तयारी दाखविली असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे फेडरेशनतर्फे सांगण्यात आले आहे.
विठ्ठल शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळाला अधिक चांगल्या पद्धतीने व्यासपीठ मिळावे आणि यातून चांगले खेळाडू पुढे यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. फेडरेशनच्या वतीने ४ आंतरराष्ट्रीय लेझर रन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चेन्नई, तिरुपती, गुडगाव, मुंबई येथे या स्पर्धा होणार आहेत.
आॅगस्टमध्ये होणाºया आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ पाठविण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक देखील नेमण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गोवा येथे होणाºया नॅशनल गेम्समध्ये देखील प्रथमच मॉडर्न पेंटॅथलॉन या खेळाचा संघ सहभागी होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.