---Advertisement---

गावस्कर नाही, ‘हा’ खेळाडू रिचर्ड्सच्या काळात होता सर्वश्रेष्ठ! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाचे मोठे वक्तव्य

On: सोमवार, एप्रिल 28, 2025 2:46 PM
---Advertisement---

जगातील महान फलंदाज वेस्ट इंडिजचे विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनी त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानणाऱ्या खेळाडूबद्दल वक्तव्य केलं आहे. रिचर्ड्स यांनी क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना त्या फलंदाजाचे नाव उघड केले आहे. महान रिचर्ड्स यांनी सुनील गावस्कर नव्हे तर माजी पाकिस्तानी दिग्गज जावेद मियांदादला (Javed miandad) त्यांच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून नाव दिले आहे.

मुलाखतीत रिचर्ड्सना विचारण्यात आले की, “खेळताना तुमच्या सर्वात जवळचा फलंदाज कोण होता?” या प्रश्नाचे उत्तर देताना विवियन रिचर्ड्स यांनी माजी पाकिस्तानी फलंदाज जावेद मियांदाद यांचे नाव घेतले. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज म्हणाले, “मी जावेदला माझ्या काळातील सर्वोत्तम फलंदाज मानतो. जर मला असा फलंदाज निवडण्यास सांगितले गेले ज्याला मी माझ्या आयुष्यासाठी फलंदाजी करण्यास सांगेन तर तो जावेद मियांदाद असेल.”

जावेद मियांदादने (Javed miandad) आपल्या कारकिर्दीत 124 कसोटी सामन्यांमध्ये 8,832 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी 23 शतकांसह 43 अर्धशतके झळकावली आहेत, तर वनडे सामन्यांमध्ये, मियांदाद 233 सामन्यांमध्ये 7,381 धावा करण्यात यशस्वी झाले आहेत. मियांदाद यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत 8 शतकांसह 50 अर्धशतके झळकावली. मियांदाद यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते.

दुसरीकडे, विव रिचर्ड्स यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजच्या या महान फलंदाजाने त्यांच्या कारकिर्दीत 121 कसोटी सामन्यांमध्ये 8,540 धावा करण्याचा रेकाॅर्ड केला आहे. रिचर्ड्स यांनी आपल्या कारकिर्दीत 24 शतकांसह 45 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच वेळी, रिचर्ड्स यांनी 187 वनडे सामन्यांमध्ये 6,721 धावा केल्या आहेत. रिचर्ड्सच्या नावावर वनडेमध्ये 11 शतके आणि 45 अर्धशतके आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---