क्रिकेटच्या मैदानात अशी वेळ अनेकदा आली आहे, जेव्हा खेळाडू त्यांच्या सीमा ओलांडतात, तेव्हा त्याची किंमत देखील त्यांना मोजावी लागते. नेदरलँड्स क्रिकेट संघाचा वेगवागन गोलंदाज विवियन किंग्मा (Vivian Kingma) सोबत असेच काहीसे घडले आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात किग्माने असे काही केले, ज्यामुळे त्याच्यावर पुढच्या चार सामन्यांसाठी आयसीसीकडून बंदी घालण्यात आली आहे.
विवियन किंग्माने मालिकेतील या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चेंडूसोबत छेडछाड केली आणि याच कारणास्तव आयसीसीने त्याच्यावर कडक करवाई केली आहे. आता किंग्माला त्याच्या पुढच्या चार सामन्यांमध्ये सहभाग घेता येणार नाही. आयसीसीने सांगितल्याप्रमाणे, “किंग्माला कलम २.१४ अंतर्गत आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करण्यासाठी दोषी आढळला आहे. किंग्मावर चेंडूसोबत छेडछाड करण्याचा आरोप आहे.”
उभय संघातील हा सामना दोहा येथे खेळला गेला. सामन्याच्या ३१ व्या षटकात किंग्मा गोलंदाजी करत होता. याच षटकात त्याने चेंडूसोबत छेडछाड केली. किंग्माने देखील त्याच्यावर झालेले आरोप स्वीकार केले आहेत आणि यानंतर त्याच्यावर पुढच्या चार सामन्यांसाठी बंदी घातली गेली आहे. त्याला पाच डीमेरिट्स गुणही दिले गेले आहेत.
दरम्यान, उभय संघातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात किंग्माने १० षटके गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने ५० धावा खर्च करून एक विकेट घेतली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांमध्ये २५४ धावा केल्या. त्यानंतर प्रत्येत्तर देताना नेदरलँड्स संघ अवघ्या १७९ धावांवर गुंडाळला गेला. या एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानने नेदरलँड्सला क्लीन स्वीप (३-०) देत विजय मिळवला.
अफगाणिस्तानसाठी मालिकेत फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी अनुक्रमे सात आणि सहा विकेट्स घेत अप्रतिम प्रदर्शन केले. फलंदाजांमध्ये हशमतुल्ला शाहिदने ३ सामन्यात १५५ धावा केल्या, तर रहमत शाहने १५३ धावा केल्या. मालिकेत सर्वाधिक २०८ धावा स्कॉट एडवर्ड्सने केल्या.
तिसऱ्या सामन्यात अडचणीत सावडलेल्या विवियन किंग्माने नेदरलंड संघासाठी आतापर्यंत १० एकदिवसीय सामने खेळले आहेत, तसेच ९ टी-२० सामन्यातही त्याने संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. किंग्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ तर टी-२० क्रिकेटमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत तो २ विकेट्स घेऊ शकला.
महत्वाच्या बातम्या –
आयएसएल: ओदिशाविरुद्ध हैदराबादचा ऑग्बेचे केंद्रस्थानी
सलग ६० दिवस मॅरेथॉन धावण्याचा आशिष कासोदेकर यांचा जागतिक विक्रम
गोलंदाजी नाही, तर द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामागे ‘हे’ मोठे कारण, शमीने व्यक्त केले स्पष्ट मत
व्हिडिओ पाहा –