---Advertisement---

“त्यानं लवकर माफी मागावी” ब्रायन लारावर भडकला विव्ह रिचर्ड्स

On: सोमवार, जुलै 22, 2024 9:45 PM
Lara And Richards
---Advertisement---

वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) आणि कार्ल हूपर (Carl Hooper) हे त्यांचा साथीदार खेळाडू ब्रायन लारावर (Brian Lara) भडकले आहेत. कारण लारानं काही दिवसापूर्वी त्याचं एक पुस्तक लाॅन्च केलं होतं. त्यामध्ये त्यानं या दोन दिग्गज फलंदाजांच्या काही अशा गोष्टी लिहल्या लिहल्या आहेत. ज्या त्यांना आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सध्या वादाचे वातवरण तयार झाले आहे.

ब्रायन लारानं त्याच्या पुस्तकात लिहलं की, “बरेच खेळाडू हे कबूल करण्याचं धाडस करत नाहीत की त्यांना व्हिव्ह रिचर्ड्स आवडत नव्हता किंवा त्यांना त्याच्याकडून भीती वाटायची. मी म्हणेन की मला व्हिव्ह रिचर्ड्स आवडतो. परंतू त्यानं मला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. पण तो कधीही यशस्वी झाला नाही.” तर हूपरनं आता लारानं त्याच्या  पुस्तकात लिहलेल्या गोष्टी चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. हूपर म्हणाला की, “रिचर्ड्स हे नेहमीच माझे गुरु आणि आधार राहिले आहेत. मी त्यांना कधीही घाबरलो नाही.”

रिचर्ड्स म्हणाला की, “लाराने या प्रकरणासाठी लवकरात लवकर माफी मागावी.” रिचर्ड्सनं लारावर त्याच्या पुस्तकाची प्रसिद्धी केल्याचा आरोप केला आणि माफी मागण्याची मागणी केली. पुढे बोलताना रिचर्ड्स म्हणाला की, “लारानं हे खोटे दावे ताबडतोब मागे घ्यावेत आणि प्रामाणिकपणे माफी मागावी.”

व्हिव रिचर्डसच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 121 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 8,540 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 50.23 राहिली. तर सर्वोच्च धावसंख्या 291 राहिली. रिचर्डसनं कसोटीमध्ये 45 अर्धशतकांसह 24 शतक झळकावले आहेत. 187 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्यानं 6,721 धावा ठोकल्या आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 189 राहिली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 45 अर्धशतकांसह 11 शतक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

करोडोंची संपत्ती, एकापेक्षा एक महागड्या गाड्या, ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा जगतोय असे आलिशान आयुष्य
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---